Melody Road Mumbai: मुंबई कोस्टल रोडवर देशातील पहिला ‘मेलडी रोड’; 60–70 च्या वेगात वाजते ‘जय हो’

मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन; हंगेरियन तंत्रज्ञानातून 500 मीटर पट्ट्यातून उमटतात संगीतमय स्वर
Melody Road Mumbai:
Melody Road Mumbai:Pudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड हा देशातील पहिलावहिला ‌‘मेलडी‌’ रोड अर्थात संगीतमय रस्ता बनला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गावरील 500 मीटरच्या संगीतमय पट्ट्याचे उद्घाटन केले.

Melody Road Mumbai:
Mumbai Metro 2B: मुंबईकरांना दुहेरी दिलासा; या दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण लवकरच, पॉडटॅक्सीचेही भूमिपूजन?

हंगेरियन तंत्रज्ञानाच्या मदतीने ‌‘मेलडी‌’ रोडची संकल्पना साकारण्यात आली आहे. यात जवळपास 500 मीटरच्या पट्ट्यात ताशी 60 ते 70 किलोमीटर प्रतिवेगाने जाणाऱ्या वाहनाच्या चाकांच्या घर्षणातून स्वरांची निर्मिती होते. हे स्वर त्या वाहनातील प्रवाशांना ऐकू येतील, अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री शिंदे, पालिकेचे अधिकारी आणि हंगेरी देशाचे कौन्सिल जनरल फ्रेंक जारी यांनी वाहनातून या रस्त्यावरून प्रवास केला, तेव्हा ‌‘स्लमडॉग मिलेनियर‌’ या चित्रपटातील ‌‘जय हो‌’ या लोकप्रिय गाण्याच्या संगीताचे सूर उमटले.

Melody Road Mumbai:
Maharashtra ZP Election Results : आघाडीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे ‌‘कमळ‌’; ठाकरेेंचे कोकण शिंदेंनी केले काबीज

यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सागरी किनारी मार्गावरून उजवीकडील मार्गिकेवर प्रवास करताना संगीतमय रस्त्याचा अनुभव येणार आहे. ही अभिनव संकल्पना आहे. वाहनचालकांना अद्ययावत हंगेरियन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‌‘जय हो‌’ या ‌‘स्लमडॉग मिलेनियर‌’ या चित्रपटातील जगप्रसिद्ध गाण्याची धून ऐकण्याची पर्वणी मिळणार आहे.

Melody Road Mumbai:
Ajit Pawar Plane Crash | विमान आणि पायलट अचानक का बदलण्यात आले?

पहिल्या टप्प्यात या रस्त्यावर 500 मीटर लांब विशेष संगीतमय रिब्स (पट्ट्या) बसविण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत तंत्रज्ञान, भारतीय संस्कृती आणि संगीताचा सुंदर मिलाफ म्हणून संगीतमय रस्ता देशभरात कुतूहलाचा विषय ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Melody Road Mumbai:
Smart Ration Card | आता शिधापत्रिका होणार ‘स्मार्ट’

असा आहे संगीतमय रस्ता

भारतातला पहिलावहिला संगीतमय रस्ता

मरीन ड्राईव्हवरील बोगदा संपल्यावर संगीतमय रस्त्याचा प्रारंभ

पहिल्या मार्गिकेवर पहिल्या टप्प्यात 500 मीटरपर्यंत विशेष पट्ट्या

रस्त्यावरील विशेष पट्ट्या आणि 60 ते 70 च्या गतीने जाणाऱ्या वाहनांच्या चाकांच्या घर्षणातून स्वरांची निर्मिती

प्रवाशांना कोणत्याही वेगळ्या उपकरणाशिवाय वाहनात ऐकू येतेय

‌‘स्लमडॉग मिलेनियर‌’ चित्रपटातील ‌‘जय हो‌’ गाण्याचे संगीत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news