Mumbai Metro 2B: मुंबईकरांना दुहेरी दिलासा; या दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण लवकरच, पॉडटॅक्सीचेही भूमिपूजन?

17–19 फेब्रुवारीदरम्यान पंतप्रधान मोदींकडून उद्घाटनाची शक्यता; दहिसर–काशिगाव आणि मंडाळे–डायमंड गार्डन टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार
Mumbai Metro 2B:
Mumbai Metro 2B:Pudhari
Published on
Updated on

मुंबई : लोकार्पण रखडलेल्या मेट्रो 2ब व मेट्रो 9 या मेट्रो मार्गिकांवरून लवकरच मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे. 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन्ही मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 मार्गिकेचा उत्तर टोकाकडील विस्तार म्हणजे मेट्रो 9 मार्गिका.

Mumbai Metro 2B:
Maharashtra ZP Election Results : आघाडीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे ‌‘कमळ‌’; ठाकरेेंचे कोकण शिंदेंनी केले काबीज

या मार्गिकेच्या दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्याचे काम गेल्या वर्षअखेरीस पूर्ण झाले होते. मात्र सीएमआरएस प्रमाणपत्र न मिळाल्याने लोकार्पण करता आले नाही. तसेच अंधेरी पश्चिम ते मंडाळे मेट्रो 2 ब मार्गिकेच्या मंडाळे ते डायमंड गार्डन या पहिल्या टप्प्याला सीएमआरएस प्रमाणपत्र मिळूनही लोकार्पण रखडले आहे.

Mumbai Metro 2B:
Ajit Pawar Plane Crash | विमान आणि पायलट अचानक का बदलण्यात आले?

दोन्ही मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केले जाण्याची शक्यता आहे. 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम होईल. मेट्रो 9 सुरू झाल्यास गुंदवलीपासून थेट काशिगावपर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल. तसेच मेट्रो 2 ब सुरू झाल्यास पूर्व उपनगराला पहिली मेट्रो मिळणार आहे. मेट्रो 2 ब मार्गिकेचा पहिला टप्पा 5.53 किमी लांबीचा आहे तर मेट्रो 9 मार्गिकेचा पहिला टप्पा 4.4 किमीचा आहे.

Mumbai Metro 2B:
Smart Ration Card | आता शिधापत्रिका होणार ‘स्मार्ट’

पॉडटॅक्सीचे भूमिपूजन ?

वांद्रे रेल्वे स्थानकापासून ते कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत पॉडटॅक्सी प्रकल्प उभारला जाणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात रोज ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या प्रवासाची सोय यामुळे होईल, असे सांगितले जाते. या प्रकल्पाची उभारणी आणि संचालन करण्यासाठी वर्षभरापूर्वीच संस्थेची नियुक्ती केली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या लोकार्पणासोबतच पॉडटॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन केले जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news