

मुंबई: डॉलरच्या नावाखाली तिघांनी कॅब चालकाला चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी तीन जणा विरोधात गुन्हा नोंद केला आहे. १७ जुलै ला तक्रारदार याने गेट वे ऑफ इंडिया जवळ गाडी पार्क केली होती.
गाडी पार्क करून ते आराम करत होते. तेव्हा एक जण त्याच्याजवळ आला. त्याने त्यांना २० डॉलर असलेली अमेरिकन नोट दाखवली. ती बदली करायची असून किती पैसे मिळतील असे त्याना सांगितले. तेव्हा तक्रारदार याने त्या नोटेचे २०० रुपये मिळतील असे सांगितले.
अशा एकूण १६३२ नोटा असल्याचे सांगितले. त्याबदल्यात ३ लाख रुपये मिळावे असे तक्रारदार याना सांगितले. दुसऱ्या दिवशी कॅबचालक कुलाबा येथे आले. त्यांनी एका ज्वेलर्सकडे दागिने गहाण ठेऊन पैसे घेतले. पैसे घेतल्यावर त्याने डॉलरवाल्याला फोन केला.
डॉलरवाल्याने एका रुमालात गुंडाळून डॉलर बॅगेत ठेवले. विश्वास बसावा म्हणून एक डॉलर ची नोट काढून दाखवली. नोट दाखवल्यानंतर ते तेथून निघून गेले. काही अंतर गेल्यावर तो रुमाल उघडला. त्यात डॉलर ऐवजी कागदाचे तुकडे होते.