Mumbai BMC news: महापालिकेत ऑक्टोबरमध्ये नवे सहाय्यक आयुक्त रूजू होणार; प्रशिक्षण कालावधी झाला पुर्ण

BMC assistant commissioners joining news: या सहाय्यक आयुक्ताचे प्रशिक्षण पुर्ण होऊन ८ दिवस उलटले असून त्यांची नेमणूक लवकरच होणार आहे
Brihanmumbai Municipal Corporation BMC Mumbai Head office
Brihanmumbai Municipal Corporation BMC Mumbai Head officePudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई महापालिकेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगतून (एमपीएससी) आलेल्या ७ सहाय्यक आयुक्तांचे १९ सप्टेबर २०२५ रोजी प्रशिक्षण पुर्ण झाले आहे. ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात या सर्व सहाय्यक आयुक्तांची नेमणूक होणार असल्याची माहिती महापालिका मुख्यालयातील सूत्रांनी दिली.

Brihanmumbai Municipal Corporation BMC Mumbai Head office
Mumbai rain news: व्हिडिओ व्हायरल! मुसळधार पावसात मुंबईकरांसाठी BMC कर्मचारी ठरला देवदूत

मुंबई महापालिकेत विभागीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांचा कारभार गेल्या तीन वर्षांपासून प्रभारी सहाय्यक आयुक्तांच्या (कार्यकारी अभियंता) खाद्यांवर सुरु आहे. मात्र आता या कारभाराला पुर्ण विराम लागणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगतून (एमपीएससी) आलेल्या ७ सहाय्यक आयुक्ताचे प्रशिक्षण पुर्ण होऊन ८ दिवस उलटले असून त्यांची नेमणूक लवकरच होणार आहे.

Brihanmumbai Municipal Corporation BMC Mumbai Head office
BMC Election : शिवसेना शिंदे गटाचा १०० जागांवर दावा; मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग

आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात आचार संहिता लावू शकते. यामुळे नियुक्ती लांबू शकते, त्यामुळे पालिका प्रशासक तथा आयुक्त भूषण गगराणी यांनी दिवाळीपुर्वीच या नव्या सहाय्यक आयुक्तांचा बार उडविण्याचे ठरविले आहे. तसेच प्रशिक्षण कालावधी पुर्ण झाल्यानंतर ताटकळत ठेवणे योग्य नसल्याने दसऱ्यानंतर नियुक्तीचे आदेश काढण्याचा मानस आहे. परिणामी पालिकेच्या ७ विभाग कार्यालयातील प्रभारी सहाय्यक आयुक्त ( कार्यकारी अभियंता) यांना सहाय्यक आयुक्तांचा पदभार रिकामा करावा लागणार आहे. यामुळे आता महापालिकेच्या ७ वॉर्ड ऑफीसर कार्यालयात पुर्ण वेळ सहाय्यक आयुक्त मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Brihanmumbai Municipal Corporation BMC Mumbai Head office
BMC firemen pension issues : महापालिकेचे सेवानिवृत्त अग्निशमन जवान पेन्शन, ग्रॅच्युइटीपासून वंचित

एमपीएससीने २५ जून २०२५ रोजी मुंबई महापालिकेकडे अनिरुध्द कुलकर्णी, आरती गोळेकर, संतोष साळुंखे, प्रफूल्ल तांबे, वृषाली इंगळे, रूपाली शिंदे आणि समरिन सय्यद आदींच्या नावाची शिफारस पाठविली होती. मात्र यापैकी समरिन सय्यद या काही व्यक्तिगत कारणामुळे ज्वाईट झाल्या नाही. त्याबदल्यात पहिल्या बॅचमध्ये प्रशिक्षण झालेले योगेश देसाई यांची नियुक्ती होणार आहे. अशाप्रकारे आता सर्व नवनियुक्त सहाय्यक आयुक्तांचे प्रशिक्षण पुर्ण झाले असून फक्त नियुक्ती कार्यालयीन आदेश निर्गमित करण्याचे बाकी आहेत.

Brihanmumbai Municipal Corporation BMC Mumbai Head office
BMC Diwali Bonus 2025 | यंदा महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या बोनसची रक्कम वाढणार

या सहाय्यक आयुक्तांची होणार नियुक्ती :

  • अनिरुध्द कुलकर्णी

  • आरती गोळेकर

  • संतोष साळुंखे

  • प्रफूल्ल तांबे

  • वृषाली इंगळे

  • रूपाली शिंदे

  • योगेश देसाई

या वॉर्डात होवू शकते नियुक्ती

१) ए वॉर्डा

२) सी वॉर्डा

३) के. पुर्व

४) एस. वार्ड

५) एन वॉर्डा

६) आर. मध्य

७) आर. उत्तर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news