Mumbai BEST Bus Accident: अंधेरीत चार BEST बसेस एकमेकांवर आदळल्या; जे.पी. रोडवर विचित्र अपघाताने खळबळ, कंडक्टर जखमी

Mumbai BEST Bus Accident: मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात जे.पी. रोडवर चार BEST बसेस एकमेकांवर आदळल्याने मोठी खळबळ उडाली. या विचित्र अपघातात एका बसचा कंडक्टर जखमी झाला असून प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे.
Mumbai BEST Bus Accident
Mumbai BEST Bus AccidentPudhari
Published on
Updated on

Mumbai BEST Bus Accident: मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात आज एक धक्कादायक आणि तितकाच विचित्र अपघात घडला. शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या BESTच्या चार बसेस एकमेकांवर आदळल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या अपघातात एका बसचा कंडक्टर जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हा अपघात अंधेरी पश्चिमेतील जे.पी. रोड परिसरात, मेट्रो रेल्वेच्या पुलाखाली घडला. नेहमीच वर्दळीचा असलेल्या या भागात अचानक एकामागोमाग चार बसेस धडकल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली. रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका बसने अचानक ब्रेक मारला आणि त्यानंतर काही क्षणांतच एकामागोमाग चार BEST बसेस एकमेकांवर आदळल्या. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक आणि मेट्रो प्रवाशांचे लक्षही या घटनेकडे वेधले गेले.

Mumbai BEST Bus Accident
Virat Kohli Video: ‘एक दिवस हे सगळं संपणार...’ शतकानंतर विराट कोहलीचं भावूक वक्तव्य, चाहते चिंतेत

सुदैवाने बसमधील प्रवाशांना मोठी दुखापत झाल्याची माहिती नाही. मात्र धडकेची तीव्रता मोठी असल्याने एका बसचा कंडक्टर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.

या घटनेनंतर पोलिस आणि BEST प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातग्रस्त बसेस बाजूला केल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. मात्र काही काळ या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Mumbai BEST Bus Accident
IPL Ticket Scam: फ्री आयपीएल तिकिटांच्या नावाखाली मोठा स्कॅम सुरू; चाहत्यांचा खिसा असा होतोय रिकामा

दरम्यान, BESTच्या ताफ्यातील बसची संख्या कमी झाल्याने सध्या कार्यरत बसवर मोठा ताण असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रवाशांचा वाढता भार, वेळेचे दडपण आणि सततची धावपळ यामुळे चालकांवर अतिरिक्त ताण येत असल्याचेही बोलले जात आहे.

पोलिस आणि BEST प्रशासन अपघाताचे नेमके कारण शोधत असून, तांत्रिक बिघाड, अचानक ब्रेक किंवा मानवी चूक यापैकी कोणते कारण यामागे होते, याचा तपास सुरू आहे. मुंबईत एकाच वेळी चार बसेसची अशी धडक झाल्याने हा अपघात चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news