

मुंबई : पूर्ण डिसेंबर महिना विषारी हवेत घालवल्यानंतर 1 जानेवारीचा दिवस मुंबईकरांसाठी दिलासा देणारा होता. मात्र, पुन्हा हवामान बिघडले असून सातत्याने हवा गुणवत्ता निर्देशांक दोनशेच्यावर आहे. सोमवारी तो सरासरी 205 वर होता. चेंबूर, जुहू तारा, पवईमध्ये सर्वाधिक प्रदूषण असल्याचे एक्यूआयच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.
मुंबईतील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक रविवारी 184 इतका होता. सोमवारी (204) त्यात मोठी वाढ झाली. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सक्रिय असलेल्या 23 आयएमडी स्टेशन्सपैकी जुहू तारा (एक्यूआय 242), पवई (239), डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, चेंबूर (235) आणि गोवंडी (225) भागात प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले. वडाळा (217), कुर्ला (214) तसेच मालाड- पश्चिम, मराठा कॉलनी (विलेपार्ले) आणि वरळी (209) तसेच चकाला, अंधेरी येथील (201) प्रदूषणाने अतिखराब हवेची पातळी ओलांडली आहे.
जुहू तारा 242
पवई 239
चेंबूर 235
गोवंडी 225
मुंबईचे किमान तापमान पुन्हा विशीखाली आले आहे. सांताक्रूझ वेधशाळेत सोमवारी किमान 19 आणि कमाल 31 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवार आणि बुधवारी (18/30 अंश सेल्सिअस) त्यात आणखी घट अपेक्षित आहे. त्यामुळे पुन्हा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविली आहे.