

मुंबई: मुंबईवरील वायू प्रदूषणाचा विळखा आणखी घट्ट होत असून शहर आणि उपनगरांतील 24 ठिकाणचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) दोनशेपार गेला आहे.
एक्यूआयच्या संकेतस्थळानुसार, देशभरातील प्रदूषित शहरांमध्ये मुंबई (एक्यूआय 192) दुसऱ्या स्थानी आहे. कोलकाताने (207) अव्वल स्थान राखले आहे. मुंबईचा विभागवार आढावा घेतल्यास, जुहू तारा (230), अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स (224), वडाळा (223), कुलाबा येथील नेव्ही नगर (222) गोवंडी येथील शिवाजीनगर (221), वांद्रे पश्चिम (217), चेंबूर गावठाण (215), शिवडी (214), कांदिवली येथील ठाकूर व्हिलेज (205), पवई येथील हिरानंदानी गार्डन तसेच मालाड पश्चिम येथील मीठ चौकी (203) आणि अंधेरी येथील आंबिवली (201) भागातील रहिवाशांचा श्वास गुदमरला आहे.
मुंबई आणि नवी मुंबईची तुलना केल्यास दुसऱ्या मुंबईपेक्षा (184) आर्थिक राजधानीमध्ये (192) हवा प्रदूषणाने आघाडी घेतली आहे. नवी मुंबईमध्ये सीबीडी बेलापूर सेक्टर 8 (214) सर्वात प्रदूषित आहे. त्या खालोखाल सीबीडी बेलापूर (208) आणि सेक्टर 15 (203) भागाचा नंबर लागतो.
जुहू तारा 230
लोखंडवाला
कॉम्प्लेक्स 224
वडाळा 223
नेव्ही नगर 222
शिवाजीनगर 221
वांद्रे पश्चिम 217
चेंबूर गावठाण 215
शिवडी 214