Mumbai Cyber Fraud: बोगस एपिके फाईल पाठवून 16 लाखांची फसवणूक

निवृत्त बँक महिलेच्या तक्रारीवरुन सायबर ठगाविरुद्ध गुन्हा
 Cyber Fraud
Cyber FraudPudhari
Published on
Updated on

मुंबई : बोगस एपिके फाईल पाठवून एका सेवानिवृत्त बँक अधिकारी असलेल्या महिलेची अज्ञात सायबर ठगाने सुमारे सोळा लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी उत्तर सायबर सेल पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

 Cyber Fraud
Kandivali Attack: कांदिवलीत तरुणांवर गर्दुल्ले, दारुड्यांचा प्राणघातक हल्ला10 ते 15 गर्दुल्ल्यांच्या टोळक्याकडून दोघांना मारहाण

77 वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार महिला बोरिवली येथील असून ती एका नामांकित बँकेतून संगणक ऑपरेटर म्हणून निवृत्त झाली आहे. गेल्या आठवड्यात सायंकाळी चार वाजता ती घरात असताना तिला एका अज्ञाताने कॉल केला होता. या व्यक्तीने सर्व पेंशनधारकांना एक कार्ड दिले असून या कार्डवरुन व्यवहार केल्यास औषध आणि इतर सामानासाठी 20 टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यातून त्यांना चांगला फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने या कार्डसाठी त्याला होकार दर्शविला.

 Cyber Fraud
Mumbai Local Train Megablock: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

काही वेळानंतर तिला दुसऱ्या क्रमाकांवरुन अन्य एका व्यक्तीने कॉल केला. त्याने तिला व्हॉट्सॲपवर एक एपिके फाईल पाठवून ती फाईल ओपन करुन तिची माहिती देण्यास सांगितले. या व्यक्तीने तिला बोलण्यात गुंतवून तिच्याकडून तिच्या वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची माहिती प्राप्त केली. या माहितीनंतर तिच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झाले. यावर या व्यवहाराचे तिला बँकेतून काही मेसेज आले. या मेसेजची पाहणी केल्यानंतर तिच्या बँक खात्यातून सुमारे सोळा लाख रुपये डेबीट झाले होते.

 Cyber Fraud
Mumbai Municipal Corporation: मुंबई महापालिका सभागृहातील अंतर्गत रचना बदलणार

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने उत्तर सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news