Mumbai Ward Star Contests: मुंबईतील १०० प्रभागांत ‘स्टार लढती’; शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक सामना

शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांत प्रतिष्ठेच्या लढती; महायुती आणि ठाकरे गटासाठी कसोटी
BMC Election
मुंबईत रंगणार बहुरंगी लढतीpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील 100 पेक्षा जास्त प्रभागांमध्ये स्टार लढती बघायला मिळणार आहेत. यात अनेक प्रभागात शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत बघायला मिळणार आहे. त्यामुळे या लढतींकडे केवळ राजकीय पक्षांचेच नाही तर मुंबईकरांचेही लक्ष केंद्रित झाले आहे.

BMC Election
BJP Municipal Election: महापालिका निवडणुकांसाठी भाजपचा प्रचाराचा मेगाप्लॅन

शिवसेनेमध्ये पडलेली फूट, निवडणुकीच्या तोंडावर या पक्षातून त्या पक्षात मारलेल्या उड्या, ठाकरे बंधूसह भाजपा शिवसेना महायुतीने प्रतिष्ठेची केलेली निवडणूक. यामुळे काही प्रभागात अटीतटीची लढत होणार आहे. त्यामुळे या स्टार लढतीकडे राजकीय पक्षांचे विशेष लक्ष राहणार असून या स्टार लढती प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. मुंबई शहरात 20 पेक्षा जास्त ठिकाणी स्टार लढती होणार असून पश्चिम उपनगरात 50 पेक्षा जास्त तर पूर्व उपनगरात 30 रिक्षाठिकाणी स्टार लढती होणार आहेत. यात अनेक प्रभागात पूर्वी ‌‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद‌’,अशी घोषणा देणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठीही या लढती प्रतिष्ठेच्या असून त्या जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांनी आतापासूनच मोर्चे बांधणी केली आहे.

BMC Election
BMC Election Politics: मातोश्रीच्या अंगणात बंडाची मशाल; वायंगणकर अपक्ष रिंगणात

अन्य प्रभागातही आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वच पक्षांनी स्थानिक नेत्यांसह मुंबई व राज्यातील वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व अन्य नेते मैदानात उतरणार आहेत. एवढेच काय तर मुंबई महापौरच्या गादीवर भाजपाचा नगरसेवक बसावा यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा नेते अमित शहा यांच्या जाहीर सभाही होणार आहेत.

BMC Election
Byculla BJP Nomination: १५ मिनिटे उशीर ठरला महाग; भायखळ्यातील दोन वॉर्डांत भाजप उमेदवार बाद

काही प्रमुख स्टार लढती

शहर

185 टी एम जगदीश (ठाकरे)- रवी राजा (भाजपा)

192 यशवंत किल्लेदार (मनसे)- प्रीती पाटणकर (शिंदे)

194 निशिकांत शिंदे ठाकरे- समाधान सरवणकर (शिंदे,)

204 अनिल कोकीळ (शिंदे)- किरण तावडे (ठाकरे)

209 यामिनी जाधव (शिंदे)- हसीना माहीमकर (मनसे)

191 विशाखा राऊत (ठाकरे)- प्रिया सरवणकर (शिंदे)

199 किशोरी पेडणेकर (ठाकरे) वंदना गवळी (शिंदे)

196 पद्मजा चेंबूरकर (ठाकरे)- सोनाली सावंत (भाजपा)

208 रमाकांत रहाटे (ठाकरे) - विजय लिपारे (शिंदे)

222 संपत ठाकूर (ठाकरे गट) रिटा मकवाना (भाजपा)

BMC Election
Navi Mumbai Municipal Election: नवी मुंबईत शिंदेसेनेचे तीन उमेदवार बाद; ९५६ पैकी ८३९ अर्ज वैध

पूर्व उपनगर

126 अर्चना भालेराव (भाजपा) शिल्पा भोसले (ठाकरे)

131 राखी जाधव (भाजपा) वृषाली सावक (ठाकरे)

164 हरिष भांदिर्गे भाजपा साईनाथ साधू कटके (ठाकरे)

168 अनुराधा पेडणेकर भाजपा सुधीर खातू (ठाकरे)

144 दिनेश पांचाळ भाजपा निमिष भोसले (ठाकरे)

149 सुषम सावंत भाजपा अविनाश मयेकर (मनसे)

BMC Election
Manoj Yadav: काँग्रेस नेते मनोज यादव यांनी पक्षावर आरोप करत दिला राजीनामा

पश्चिम उपनगर

1 शितल म्हात्रे (काँग्रेस)- फोरम परमार (ठाकरे)

2 तेजस्विनी घोसाळकर (भाजपा)- धनश्री कोलगे (ठाकरे)

4 संजना घाडी (शिंदे)- राजू मुल्ला (ठाकरे)

3 प्रकाश दरेकर (भाजपा)-रोशनी गायकवाड (ठाकरे)

7 गणेश खणकर (भाजपा)-सौरभ घोसाळकर (ठाकरे)

61 राजुल पटेल (शिंदे)-सेजल सावंत (ठाकरे)

63 देवेंद्र (बाळा) आंबेरकर (ठा.)-रुपेश सावरकर (भा.)

64 सबा हारून खान (ठाकरे)-सरिता राजपुरे (भाजपा)

95 चंद्रशेखर वायंगणकर (अपक्ष)-हरी शास्त्री (ठाकरे)

90 तुलीप मिरिंडा (काँग्रेस)-ज्योती उपाध्याय (भाजपा)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news