BMC Election Politics: मातोश्रीच्या अंगणात बंडाची मशाल; वायंगणकर अपक्ष रिंगणात

उमेदवारी डावलल्याने नाराज माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकरांचा ठाकरे गटाला थेट इशारा
BMC Election 2025
BMC Election 2025Pudhari
Published on
Updated on

मुंबई : वांद्रे येथील मातोश्रीच्या परिसरातील ठाकरेंचे निष्ठावंत माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांना डावलून हरी शास्त्री यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उफाळली आहे.

BMC Election 2025
Byculla BJP Nomination: १५ मिनिटे उशीर ठरला महाग; भायखळ्यातील दोन वॉर्डांत भाजप उमेदवार बाद

उमेदवारी डावलल्याने नाराज झालेले वायंगणकर यांनी आक्रमक पवित्रा घेत बंडाची मशाल पेटवून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. आपण कुठल्याही परिस्थितीत अर्ज मागे घेणार नसून, उलट ही जागा आपण निवडून आणून पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार, असा निर्धारही वायंगणकर यांनी बोलून दाखवला आहे.

BMC Election 2025
Navi Mumbai Municipal Election: नवी मुंबईत शिंदेसेनेचे तीन उमेदवार बाद; ९५६ पैकी ८३९ अर्ज वैध

ठाकरे बंधूंच्या युतीमुळे जागवाटपात झालेल्या रस्सीखेचात उद्धवसेनेला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी निष्ठावंत व इच्छुकांना उमेदवारी डावलल्याने बंडखोरी झाली आहे. वांद्रे येथील प्रभाग क्रमांक 95 मध्ये माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षाचे नेते, आमदार डॉ. अनिल परब यांनी आग्रही भूमिका घेतली होती.

BMC Election 2025
Manoj Yadav: काँग्रेस नेते मनोज यादव यांनी पक्षावर आरोप करत दिला राजीनामा

तर आमदार वरुण सरदेसाई यांनी हरी शास्त्रीसाठी ताकद लावली. येथील उमेदवारीवरून दोघांमध्ये वादही झाला होता. या भांडणात हरी शास्त्री यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. त्यामुळे माजी नगरसेवक वायंगणकर यांनी टोकाचे पाऊल उचलून थेट अपक्ष उमेदवारी अर्ज भरून ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात मोठे आव्हान उभे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news