दूध आंदोलन | ५ रुपये अनुदान अमान्य; ४० रुपये लीटर दरासाठी शेतकरी ठाम

१० रुपये कायमस्वरूपी अनुदान सुरू करण्याची मागणी
The price of milk
दुधासाठी किमान 10 रुपये प्रति लिटर अनुदान कायमस्वरूपी देण्याची आवश्यकता आहेFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दुधाचे कोसळलेले भाव सावरण्यासाठी किमान 10 रुपये प्रति लिटर अनुदान हे कायमस्वरूपी देण्याची आवश्यकता आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी 1 जुलै पासून पुन्हा 5 रुपये अनुदान योजना सुरू करण्याची घोषणा सभागृहात केली आहे. मात्र, मागील अनुभव पाहता केवळ 5 रुपये अनुदानाने दूध दराचा प्रश्न सुटणार नाही ही वस्तुस्थिती आहे. किमान 10 रुपये कायमस्वरूपी अनुदान सुरू करण्या सोबतच देशांमध्ये पडून असलेली दूध पावडर निर्यात होण्यासाठी प्रोत्साहन अनुदान देण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने दूध पावडर आयात करण्याची दिलेली परवानगी मागे घेणेही आवश्यक आहे.

The price of milk
Milk Powder Import : केंद्राने दूध पावडर आयातीचा निर्णय मागे घ्यावा

5 रुपये अनुदानाची घोषणा करून सरकार वेळ मारून नेत आहे.

राज्यातले सरकार केवळ 5 रुपये अनुदानाची घोषणा करून वेळ मारून नेत आहे. यामुळे प्रश्न अजिबात सुटणार नाही, किंबहुना तो अधिक जटील होत जाणार आहे. मागील वेळी सुद्धा अशाच प्रकारे 5 रुपयाचे अनुदान दिले. मात्र, त्यामुळे दुधाचे भाव सुधारले नाहीत. अटी शर्तींचा परिणाम म्हणून राज्यातील खूपच थोड्या दूध उत्पादकांना अनुदानाचा लाभ मिळाला होता. नव्याने अनुदान सुरू करून पुन्हा त्याच अटी शर्ती लागू झाल्यास पालथ्या घड्यावर पाणीच पडणार आहे.

The price of milk
दूध दरासाठी शेतकरी आक्रमक; उद्यापासून राज्यभर आंदोलन

शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदानाचा तोडगा मान्य नाही.

मागील अनुदान काळात संघटित ताकदीच्या जोरावर दूध संघ आणि खासगी दूध कंपन्यांनी अनुदान मिळत असल्याच्या काळात सुद्धा दुधाचे भाव पाडले होते. अशा पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना केवळ 5 रुपये अनुदानाचा तोडगा मान्य नाही. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आपले आंदोलन सुरूच ठेवणार आहे.

The price of milk
दूध दरावर तोडगा निघणार? सरकारने बोलावली महत्वाची बैठक

राज्यभरातील दूध उत्पादकांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करावे व सरकारला दूध क्षेत्रामध्ये शाश्वत सुधारणा करायला भाग पाडावे असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news