दूध दरावर तोडगा निघणार? सरकारने बोलावली महत्वाची बैठक

विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात शनिवारी बैठक
Meeting regarding milk price hike
दूध दरवाढी संदर्भात सरकारने बोलावली महत्वाची बैठक file photo

मुंबई : दूध दरवाढी संदर्भात सरकारकडून दूध प्रकल्प प्रतिनिधी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची महत्वाची बैठक शनिवार (दि.२९) विधानभवनात बोलावण्यात आली आहे. राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढला जाणार आहे.

Meeting regarding milk price hike
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक

या बैठकीला राज्यातील खासगी तथा सहकारी दूध महासंघाचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी सांगितले. बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल व या बैठकीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल. तसेच लवकरच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे आयुक्त मोहोड यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news