MHADA Lottery: ताथवडे येथील म्हाडाच्या 792 घरांसाठी सोडत; आजपासून अर्ज प्रक्रिया, 8 जुलैला निकाल

अल्प उत्पन्न गटासाठी 24 सदनिका असून त्यांची किंमत 46 ते 47 लाख रुपये आहे.
MHADA Lottery
MHADA LotteryPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत म्हाडाच्या पुणे मंडळाने 792 घरांचा प्रकल्प उभारला असून त्यासाठी आजपासून अर्जविक्री व स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात होत आहे. ताथवडे येथे असणाऱ्या या घरांसाठी 8 जुलैला सोडत काढली जाणार आहे.

अल्प उत्पन्न गटासाठी 24 सदनिका असून त्यांची किंमत 46 ते 47 लाख रुपये आहे. मध्यम उत्पन्न गटाच्या 768 सदनिकांची किंमत 64 लाख 50 हजार ते 65 लाख 50 हजार रुपये आहे. पुणे मंडळाने काही वर्षांपूर्वी ताथवडे येथील जमीन खरेदी केली होती.

MHADA Lottery
MMC Election: एमएमसी निवडणुकीत राज्यात केवळ 12, तर मुंबईत फक्त 8 टक्के मतदान

या जमिनीवर दोन टप्प्यांत घरे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 600 हून अधिक घरे बांधून त्याची विक्री पूर्ण केली आहे, तर आता दुसऱ्या टप्प्यातील 792 घरांचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम चार महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे या घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेऊन रविवारी या घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

MHADA Lottery
KEM Hospital Name Change: केईएमच्या नामबदलास मार्डचा विरोध; प्रस्ताव तातडीने मागे घेण्याची मागणी

सोडतीसाठी 2 जूनपर्यंत अनामत रकमेसह इच्छुकांना अर्ज सादर करता येणार आहे. 30 जूनला पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, तर 8 जुलैला दुपारी 12 वाजता सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. अल्प गटातील घरे 59.08 चौरस मीटर ते 60.66 चौरस मीटर क्षेत्रफळाची आहेत.

मध्यम उत्पन्न गटातील घरे 69.34 चौरस मीटर ते 70.92 चौरस मीटरची आहेत. या सोडतीत सहभागी होण्यासाठी अल्प गटातील अर्जदारांना 50 हजार रुपये, तर मध्यम गटातील अर्जदारांना 75 हजार रुपये अशी अनामत रक्कम भरावी लागणार आहे, तर 708 रुपये असे अर्जाचे शुल्क असणार असून हे शुल्क विनापरतावा असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news