KEM Hospital Name Change: केईएमच्या नामबदलास मार्डचा विरोध; प्रस्ताव तातडीने मागे घेण्याची मागणी

‘केईएम‌’ हे केवळ नाव नसून सार्वजनिक आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवेचा दीर्घकालीन वारसा आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
KEM Hospital Name Change
KEM Hospital Name ChangePudhari
Published on
Updated on

मुंबई: किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालय या ऐतिहासिक रुग्णालयाच्या नावबदलाच्या प्रस्तावाला मार्ड (रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन)ने तीव्र विरोध दर्शवला आहे. ‌‘केईएम‌’ हे केवळ नाव नसून सार्वजनिक आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवेचा दीर्घकालीन वारसा आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, केईएम रुग्णालयाची ओळख देशभरातच नव्हे,तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. अनेक पिढ्यांतील डॉक्टर, विद्यार्थी, कर्मचारी आणि रुग्णांसाठी या नावाला विशेष भावनिक आणि व्यावसायिक महत्त्व आहे. अशा संस्थेचे नाव बदलण्यापूर्वी संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा सल्ला न घेणे अत्यंत निराशाजनक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

KEM Hospital Name Change
BMC Financial Decline: मुंबई पालिकेच्या 8 हजार कोटींच्या मुदतठेवी तीन वर्षांत मोडल्या

‌‘निवासी डॉक्टर हे रुग्णालयाचा कणा आहेत. त्यांच्या मताला डावलून घेतलेला कोणताही निर्णय आम्हाला मान्य नाही,‌’ असा इशाराही मार्डकडून देण्यात आला आहे. नावबदलाच्या निर्णयाऐवजी रुग्णालयातील मूलभूत समस्यांकडे लक्ष देणे अधिक गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

KEM Hospital Name Change
Ravindra Chavan Delhi visit: भाजप उमेदवार नावनिश्चितीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्लीत

रुग्णालयात अपुरी वसतिगृह सुविधा, वारंवार बंद पडणाऱ्या लिफ्ट्स, तसेच मानधन वितरणातील अनियमितता या प्रश्नांकडे मार्डने लक्ष वेधले. ‌‘नवीन ओळख निर्माण करायची असल्यास अत्याधुनिक सुविधा असलेले नवे रुग्णालय उभारावे. मात्र केईएमसारख्या ऐतिहासिक संस्थेची ओळख बदलू नये,‌’ अशी स्पष्ट भूमिका संघटनेने मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news