MHADA flats Mumbai: म्हाडाकडून मुंबईत 120 घरे विक्रीसाठी उपलब्ध; ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर ऑनलाइन अर्ज

5 फेब्रुवारीपासून अर्ज नोंदणी सुरू; कांदिवली, पवई, वडाळा, घाटकोपरसह अनेक भागांत सदनिका
MHADA flats Mumbai
MHADA flats MumbaiPudhari
Published on
Updated on

मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील 120 सदनिका ‌‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य‌’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया 5 फेब्रुवारीला सकाळी 11 वा. सुरू होणार आहे.

MHADA flats Mumbai
Mulund Water Tunnel: कशेळी–मुलुंड जकात नाका जलबोगदा प्रकल्प वेगात; ऑक्टोबर 2030 पर्यंत काम पूर्ण होणार

यापूर्वी सोडतीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मात्र विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदनिकांचा यात समावेश आहे. इच्छुक नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, योजना/सदनिका निश्चिती करणे या प्रक्रियेला 12 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजेपासून सुरुवात होणार आहे. सदनिकेच्या विक्री किमतीच्या 10 टक्के रकमेचा भरणा सदनिका निश्चिती केल्यानंतर 48 तासांच्या आत अर्जदाराने करणे आवश्यक आहे.

MHADA flats Mumbai
BMC Budget Postponed: मुंबई महापालिकेचा 2026-27 चा अर्थसंकल्प पुढे ढकलला; स्थायी समिती अस्तित्वात आल्यानंतरच सादरीकरण

अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारास बुक माय होमसाठी बटन दिसेल. त्यावर विंग/इमारत क्रमांक, सदनिका क्रमांक, मजला याची माहिती उपलब्ध असेल. अर्जदार त्यांना हवी असणारी सदनिका उपलब्ध असल्यास ती निवडू शकतात. अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्ज फक्त पाहता येऊ शकेल.

अर्जदाराने त्याचा ऑनलाईन अर्ज उघडून त्यामध्ये कोणताही फेरफार करणे शक्य होणार नाही. अर्जदाराने प्रिंटेड पावतीमधील माहिती वाचून बरोबर असल्याची खात्री करावी. सदनिका निश्चिती केल्यानंतर 48 तासांच्या आत सदनिकेच्या विक्री किंमतीच्या दहा टक्के रक्कम भरणा आवश्यक असेल. रकमेचा भरणा केल्यानंतर ती म्हाडाकडे प्राप्त झाल्याची खात्री करून अर्जदारास ऑनलाईन पद्धतीने सदनिकेची रक्कम भरून घेण्यासाठी तात्पुरते देकार पत्र देण्यात येईल.

MHADA flats Mumbai
Mumbai Cleanliness Fine: थुंकल्यास 250, कचरा टाकल्यास 500 रूपये दंड!

कुठे, किती घरे ?

म्हाडाने बांधलेल्या शिंपोली, कांदिवली येथील 8 सदनिका, चारकोप सेक्टर-8 कांदिवली येथील 2 सदनिका, अँटॉप हिल-वडाळा येथील 27 सदनिका, तुंगा पवई येथील 44 सदनिका, पीएमजीपी मानखुर्द येथील 1 सदनिका, मालवणी मालाड येथील 1 सदनिका, गायकवाड नगर मालवणी-मालाड येथील 1 सदनिका अशा 84 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच विकास नियंत्रण नियमावली 33(5) (7) अंतर्गत मंडळाला प्राप्त झालेल्या सदनिकांमधून घाटकोपर पूर्व येथील 2 सदनिका, कन्नमवार नगर विक्रोळी येथील 1 सदनिका, अँटॉप हिल-वडाळा येथील 8 सदनिका, भायखळा येथील 6 सदनिका, ताडदेव येथील 6 सदनिका, लोअर परळ येथील 4 सदनिका, शीव येथील 2 सदनिका, जेव्हीपीडी अंधेरी पश्चिम येथील 7 सदनिका अशा 36 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news