Mumbai Cleanliness Fine: थुंकल्यास 250, कचरा टाकल्यास 500 रूपये दंड!

क्लीनअप मार्शल योजना बंद झाल्यानंतर पालिकेची नवी नियमावली; जबाबदारी थेट पालिका कर्मचाऱ्यांवर
Cleanliness Drive
Cleanliness DrivePudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबईत क्लीनअप मार्शल सेवा बंद झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणारे मोकाट सुटले होते. त्यावर जरब बसावी म्हणून प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली असून आता सार्वजनिक स्थळी थुंकल्यास 250 तर कचरा टाकल्यास 500 रूपये दंड आकारण्यात येणार आहे.

Cleanliness Drive
Pravin Darekar Mahad: महाड-पोलादपूरसाठी निर्भय भविष्य हवे असेल तर भाजप-राष्ट्रवादी युतीच पर्याय : आ. प्रवीण दरेकर

2006 साली पालिका प्रशासनाने याबाबत नियमावली जाहीर केली होती. यातील दंडाच्या रक्कतेम वाढ करीत आता ही नवीन नियमावली जाहीर केली असून पालिका कर्मचाऱ्यांवरच याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Cleanliness Drive
Savarkar Sadan Heritage: सावरकर सदनला केंद्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा नाकारला; पुरातत्त्व विभागाची उच्च न्यायालयात भूमिका

मुंबईत क्लीनअप मार्शल ही योजना सुरू होती. योजना चांगली होती, मात्र योजनेच्या नावाखाली वसुली सुरू झाल्याने ती बदनाम झाली आणि योजना बंद करण्यात आली. मात्र यामुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता हा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिकेने दंडाची रक्कम वाढवत नवीन नियम जाहीर केले आहेत. या अंतर्गत, सार्वजनिक स्थळी थुंकल्यास 250, कचरा टाकल्यास 500, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास 200, विनापरवाना राडारोडा वाहतूक केल्यास 25 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

Cleanliness Drive
Dadar Murder Case: दादरमध्ये चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या तरुणाची हत्या; सहकाऱ्याला पोलिसांनी केली अटक

होणारा दंड असा (रुपयांमध्ये)

कचरा टाकणे : 500

थुंकणे : 250

आंघोळ : 300

लघवी करणे : 500

शौच करणे : 500

प्राणी किंवा पक्ष्यांना खाद्य : 500

भांडी, कपडे धुणे : 300

वाहन धुणे : 500

अंगण अस्वच्छ : 500

एकत्रित कचरा : 200

कचरा निर्मिती : 1000

राडारोडा : 20,000

मांसविषयक कचरा : 750

फेरीवाल्यांसाठी : 750

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news