metro : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई ‘मेट्रो’ला हिरवा झेंडा

metro : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई ‘मेट्रो’ला हिरवा झेंडा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज (शनिवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रो ७ आणि मेट्रो २ ए ला हिरवा झेंडा दाखवत लोकार्पण केले. त्यामुळे दहिसर ते आरे मिल्क कॉलनी मेट्रो मार्ग खुला झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मेट्रोचे (metro)  तिकीट काढून मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर त्यांनी सर्व उपस्थितांसोबत मेट्रोतून सफर केली.

पहिल्या टप्प्यामध्ये मेट्रो (metro)  ७ आणि २ ए या मार्गावर २० किलोमीटरपर्यंत मेट्रो सुरू झाली आहे. आता या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील १५ किलोमीटर मार्गाचे काम सुरू करण्यात येणार आहे. तर काही मेट्रो स्थानकावरील कामे अपूर्ण आहेत. आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर ही कामे मार्गी लागणार आहेत. मुंबई 'मेट्रो ७' च्या तिकिटाचे किमान दर १० रुपये, तर कमाल दर ८० रुपये असेल.

'मेट्रो २ ए' हा मार्ग १८.५ किलोमीटर लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएननगर स्थानकापर्यंत 'मेट्रो २ ए' मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएननगर अशी स्थानके आहेत.

मेट्रो-७ मार्गावर दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे, गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) अशी १४ स्थानके आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार सुनील प्रभू आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news