Mandovi Express Delayed: मांडवी एक्स्प्रेस तब्बल 3 तास उशिरा; कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचा गोंधळ

मेगाब्लॉकमुळे ‘कोकण कन्या’ उशिरा; मशीद स्थानकाजवळ साखळी ओढल्याने वाढला विलंब
Mandovi Express Delayed
Mandovi Express DelayedPudhari
Published on
Updated on

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाची समजली जाणारी मांडवी एक्स्प्रेस गुरुवारी नियोजित वेळेपेक्षा तब्बल तीन तास उशिराने सुटल्याने प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला आणि प्रवासी रखडले.

Mandovi Express Delayed
Konkan Petroglyphs Research: कोकणातील कातळशिल्पांच्या संशोधनासाठी वर्ल्ड हेरिटेज डेस्क

कोकण रेल्वे मार्गावर सध्या काही तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येत आहेत. या ब्लॉकमुळे मुंबईच्या दिशेने येणारी कोकण कन्या एक्स्प्रेस मार्गात विविध ठिकाणी थांबवून ठेवण्यात आली होती. परिणामी, कोकण कन्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा बऱ्याच उशिरा मुंबईत पोहोचली, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Mandovi Express Delayed
Narhari Zirwal: मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कारकुनाला लाच घेताना अटक, मंत्रालयातच सापळा

रेल्वेच्या नियमानुसार, ज्या रेल्वे डब्यांचा वापर कोकण कन्यासाठी केला जातो, तेच डबे तपासणीनंतर मांडवी एक्स्प्रेससाठी वापरले जातात. कोकण कन्याच उशिरा आल्याने मांडवी एक्स्प्रेसच्या सुटण्याच्या वेळेवर त्याचा थेट परिणाम झाला. त्यातच मार्गात मशीद स्थानकाजवळ आपत्कालीन साखळी ओढल्याने काही काळ गाडी थांबली आणि विलंबात भर पडली.

Mandovi Express Delayed
CM Devendra Fadnavis | स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून राज्याचे होणार वेगाने परिवर्तन

गेले अनेक दिवस गाड्यांचा विलंब नित्याचा होत असून,परिणामी स्थानकांवर गर्दी तुंबत आहे. बुधवारी तेजस एक्स्प्रेस तब्बल सहा तास उशिरा धावली. वेळ बदलल्याची घोषणा करूनही तेजसचे प्रत्यक्ष प्रस्थान आणखी लांबले. रात्री पोहोचणारी ही गाडी पुढील दिवशी सकाळी दाखल झाल्याने प्रवाशांचे नियोजन कोलमडले. पाठोपाठ गुरुवारी मांडवी एक्स्प्रेस तीन तास विलंबाने धावली.

वेळापत्रक कोलमडले

परिणामी दादरसह पुढील स्थानकांवरील वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. त्यामुळे सीएसएमटी, दादर आणि ठाणे येथे गाडीची वाट पाहाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. ऐन गर्दीच्या हंगामात स्थानकावर ताटकळत उभे राहावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. रेल्वेकडून नेमकी माहिती उशिरा मिळाल्याचा आरोप अनेक प्रवाशांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news