Bomb threat call : मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक

Bomb threat call : मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: Bomb threat call : मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला रविवारी (दि.६ ऑगस्ट) साखळी बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या व्यक्तीला जुहू पोलिसांनी जुहू परिसरातून अटक केली आहे. चौकशी दरम्यान (Bomb threat call) या व्यक्तीने दारूच्या नशेत कॉल केला असल्याची माहिती समोर आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास केल्यानंतर दारूच्या नशेत धमकी दिल्याचे समोर आले आहे. यानंतर संबंधित व्यक्तीला अटक करत, त्याच्यावर जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देखील पोलिसांकडून (Bomb threat call) देण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांना रविवारी (दि.६ ऑगस्ट) एका व्यक्तीकडून पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. या व्यक्तीने मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचे पोलिसांना सांगितले. कॉल करणारी ही अज्ञात व्यक्ती मुंबईतील विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचा दावा केला आहे. फोन करणाऱ्याने पोलिसांना (Bomb threat call) फोन केल्यानंतर या व्यक्तीने फोन बंद केला होता, अशी माहिती देखील मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news