Threat call : मुंबई विमानतळ बॉम्‍बने उडवून देण्‍याची धमकी, सुरक्षा यंत्रणांकडून अलर्ट | पुढारी

Threat call : मुंबई विमानतळ बॉम्‍बने उडवून देण्‍याची धमकी, सुरक्षा यंत्रणांकडून अलर्ट

पुढारी ऑनलाईन: मुंबईमध्ये धमकीचे सत्र सुरूच आहे. सोमवारी (दि.०६) रात्री उशीरा पुन्हा एकदा मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन (Threat call) आला. या फोनवरून बोलणाऱ्या अज्ञात व्यक्तीने स्वत:ची ओळख इरफान अहमद शेख अशी सांगितले. आपण इंडियन मुजाहिद्दिन या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे त्‍याने सांगितले आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

धमकीचा फोन (Threat call) करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनेआंतरराष्ट्रीय विमानतळ उडवण्याची धमकी दिली. यानंतर येथील कर्मचाऱ्यांनी तातडीने ही माहिती मुंबई पोलिसांना दिली. मुंबई पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क झाल्या आहेत. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ सुरक्षेत  वाढ करण्यात आली असल्याची माहिती येथील मुंबई पोलिसांनी दिली.

Threat call: यापूर्वी मिळाला होता धमकीचा मेल

काही दिवसांपूर्वा एका मेलद्वारे मुंबईसह राज्यातील काही महत्त्‍वाच्‍या शहरात दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) आलेल्या एका मेलवर ही धमकी देण्यात आली होती. धमकी देणारी व्यक्ती स्वतःला तालिबानी दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगत होती. या धमकीच्या मेलमुळे एकच खळबळ उडाली असून, मुंबईसह राज्यातील सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या मेलची सत्यता तपासण्यात येत असून, हा मेल कुठून आला, कोणी पाठवला याचा तपास सुरू असल्याची माहिती येथील पोलिस आणि तपास यंत्रणेने दिली होती.

हेही वाचा : 

Back to top button