SSC supplementary exam 2026: दहावीच्या जून-जुलै पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; 21 मेपर्यंत नियमित शुल्कातून अर्ज करण्याची संधी

12 मे 21 मे तर विलंब शुल्कासह अर्ज 22 ते 25 मेदरम्यान स्वीकारले जाणार आहेत.
SSC supplementary exam 2026
SSC supplementary exam 2026File Photo
Published on
Updated on

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या दहावी मार्च 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता जून-जुलै 2026 मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पुनर्परीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत अर्ज करणारे तसेच आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत.12 मे 21 मे तर विलंब शुल्कासह अर्ज 22 ते 25 मेदरम्यान स्वीकारले जाणार आहेत.

SSC supplementary exam 2026
War Impact: काळ मोठा कठीण! युद्धामुळे जगभरातील देशांनी काय पावलं उचलली?

विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन भरावी लागणार आहेत. माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांची शुल्क रक्कम आरटीजीएस/एनईएफटीद्वारे 26 मेपर्यंत भरायची असून, आरटीजीएस/एनईएफटी पावती, विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे 29 मेपर्यंत जमा कराव्या लागणार आहेत. ही आवेदनपत्रे ऑनलाईन सबमिट झाल्यानंतर शाळांच्या लॉगिनवर ‌‘प्रिलिस्ट‌’ उपलब्ध करून दिली जाणार आहे. दिलेली माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून पाहणे आवश्यक आहे.

फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन प्रणालीत उपलब्ध होणार असल्याने त्यांना अर्ज प्रक्रिया सुलभ होणार आहे. याशिवाय श्रेणीसुधार योजनेअंतर्गत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027 आणि जून-जुलै 2027 अशा सलग तीन संधी उपलब्ध राहणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. ‌

SSC supplementary exam 2026
Harshvardhan Sapkal Targets BJP: भाजपच्या राजवटीत गुन्हेगारांना अभय; पेपर लीक करणारे मोकाट

‘कौशल्य सेतू अभियान‌’ अंतर्गत ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन अर्ज करता येणार असून, संबंधित विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसह हार्ड कॉपी विभागीय मंडळात जमा करावी लागणार आहे. शुल्क भरण्याबाबत मंडळाने विशेष सूचना देताना, अधिकृत संकेतस्थळावरून मिळणाऱ्या ऑनलाईन चलनावरील बँकेच्या व्हर्च्युअल अकाउंटमध्येच एनईएफटी/आरटीजीएसद्वारे शुल्क जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news