Collector Offices Maharashtra: राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांना मान्यता

प्रशासकीय कामकाजाचा वाढता व्याप लक्षात घेऊन राज्य सरकारचा निर्णय; 143 नवीन पदे निर्माण होणार
Collector Offices Maharashtra: राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांना मान्यता
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील वाढती लोकसंख्या, दुर्गम भागातील भौगोलिक स्थिती आणि प्रशासकीय कामकाजाचा वाढता व्याप लक्षात घेत राज्य सरकारने 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत याबाबतचे निवेदन केले.

Collector Offices Maharashtra: राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांना मान्यता
Mumbai Hotel Gas Shortage: गॅस टंचाईचा फटका; महामुंबईतील 35 टक्के हॉटेल्स बंद

महसूलमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, रत्नागिरी, पुणे (बारामती), सातारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि नागपूर या 11 जिल्ह्यांमध्ये नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये प्रस्तावित करण्यात आली असून, त्यांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याशिवाय, जमाबंदी आयुक्त कार्यालयातील कामकाजाचा भार कमी करण्यासाठी तिथेही दोन अतिरिक्त अपर जिल्हाधिकारी पदे देण्यात आली आहेत.

Collector Offices Maharashtra: राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांना मान्यता
MMR Women Employees: एमएमआरमधील महिला कर्मचाऱ्यांना ‘लवकर या, लवकर जा’ सवलत; 180 दिवसांची प्रसूती रजाही मंजूर

या नवीन कार्यालयांच्या कामकाजासाठी उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिल्याप्रमाणे एकूण 143 पदांची निर्मिती केली जाणार आहे. प्रत्येक अपर जिल्हाधिकारी कार्यालयात 13 कर्मचारी, अधिकारी असतील. मंत्रिमंडळाने 10 फेब्रुवारी 2026 रोजीच्या बैठकीत ‌‘एस-25‌’ या वरिष्ठ वेतनश्रेणीतील पदांना अंतिम मंजुरी दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

तसेच, केवळ अपर जिल्हाधिकारीच नव्हे, तर राज्यात 69 नवीन अपर तहसील कार्यालये आणि 10 नवीन प्रांत कार्यालये निर्माण करण्याचा प्रस्तावही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.

Collector Offices Maharashtra: राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांना मान्यता
Gas shortage | छत्रपती संभाजीनगरातील 90 टक्के उद्योगांवर टाळेबंदीची टांगती तलवार; नाशिकचे निम्मे बंद

चर्चेदरम्यान नाना पटोले यांनी साकोली आणि हिंगणघाट येथेही अशा कार्यालयांची मागणी केली. त्यावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, 2027 च्या जनगणनेनंतर जिल्ह्यांच्या पुनर्रचनेचा विचार होऊ शकतो; मात्र सध्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून प्रशासन लोकांच्या दारी नेत आहोत. साकोली आणि हिंगणघाटसंदर्भात लवकरच विशेष बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news