Devendra Fadnavis: शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत परिवर्तनासाठी सर्वेक्षणाची मदत; देवेंद्र फडणवीस यांचा विश्‍वास

ॲक्सिस माय इंडियामार्फत विविध विभागांच्या योजनांचा आढावा; नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविण्यावर भर
Devendra Fadnavis
Devendra FadnavisPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: शासकीय योजनांची व्याप्ती वाढविणे, नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे आणि त्यांच्या अंमलबजावणीतील परिणामकारकता तपासणे महत्त्‍वाचे असल्याने यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.

सर्वेक्षणाच्या माध्यमातून शासकीय योजनाच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच त्यामध्ये गुणात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Devendra Fadnavis
Mumbai Tree Cutting: मुंबईतील ४४७ झाडांवर कुर्‍हाड; झाडे कापण्यासाठी उद्यान विभागाचा ग्रीन सिग्नल

माहिती व जनसंपर्क विभागामार्फत नियुक्त ॲक्सिस माय इंडिया या संस्थेमार्फत विविध विभागांच्या योजनांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ते बोलत होते.

विविध शासकीय विभागांच्या सहकार्याने योजनांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. राज्यातल्या अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी या सर्वेक्षणांचा चांगला उपयोग होऊ शकतो.

Devendra Fadnavis
Pradeep Purnekar Case: मीनाक्षी शिंदे यांनी सुपारी दिल्याची आरोपीकडून कबुली; राम पूर्णेकर यांचा दावा

प्रत्यक्ष कामकाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्याची मदत होईल. त्यामुळे संबंधित विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांनी आवश्यक सहकार्य करावे, असे फडणवीस म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news