Mumbai Tree Cutting: मुंबईतील ४४७ झाडांवर कुर्‍हाड; झाडे कापण्यासाठी उद्यान विभागाचा ग्रीन सिग्नल

विविध प्रकल्पांसाठी झाडे कापण्याचे आणि पुनर्रोपणाचे नियोजन; वृक्ष प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर पुढील कारवाई
Tree Cutting
Tree CuttingPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: भीमाशंकर जंगलातील झाडे कापण्यावरून राजकीय वातावरण तापलेले असताना मुंबईतही विविध विकास कामांच्या नावाखाली ४४७ झाडे हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे ही झाडे आपला जीव गमावणार असून यात जुन्या झाडांचाही समावेश आहे.

विकासाच्या नावाखाली मुंबईत प्रत्येक महिन्याला शेकडो झाडांचा बळी जातो. येणाऱ्या महिन्याभरात ४०६ झाडे हटवण्यात येणार आहेत. यात काही झाडे पूर्णपणे कापण्यात येणार असून काही झाडे पुनर्रोपनच्या नावाखाली हटवली जाणार आहेत.

झाडे कापण्यास उद्यान विभागाने ग्रीन सिग्नल दिला असून वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकृत मंजुरीनंतर ही झाडे हटवण्यात येणार आहेत. यात १५ ते २५ वयाच्या झाडांसह ३० ते ४० वर्ष जुन्या झाडांचा समावेश आहे. कांदिवली पश्चिमेला एका हॉस्पिटल इमारतीच्या बांधकामात अडथळा निर्माण करणारी ४३ झाडे कापण्यात येणार असून ५४ झाडांचे पुनर्रोपण अशी ९७ झाडे हटवण्यात येणार आहेत.

Tree Cutting
Pradeep Purnekar Case: मीनाक्षी शिंदे यांनी सुपारी दिल्याची आरोपीकडून कबुली; राम पूर्णेकर यांचा दावा

प्रभादेवी श्री साई सुंदर नगर झोपडपट्टी पुनर्विकास अंतर्गत ९९ झाडांचा बळी जाणार आहे. यात ७६ झाडे पूर्णपणे कापण्यात येणार असून २३ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. बांद्रा पाली हिल रोड येथील एका खाजगी इमारतीच्या बांधकामात अडथळा निर्माण करणारी ६३ झाडे हटवली जाणार आहेत.

अंधेरी पूर्वेकडील विघ्नहर्ता झोपडपट्टी पुनर्विकास अंतर्गत ३० झाडे हटवली जाणार असून परळ शिवडीतील खाजगी इमारतीच्या बांधकामासाठी ७१ झाडे हटवण्यात येणार आहेत.

Tree Cutting
Vishakha Raut: विशाखा राऊत यांचे अपील फेटाळले; कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल यांचा निर्णय

विकासामध्ये अडथळा निर्माण करणारी झाडे कापण्यास परवानगी देण्यात येणार असली तरी या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही झाडे लावल्यानंतर ती जगवण्याची जबाबदारी ही झाडे कापणाऱ्याची राहणार आहे. विशेष म्हणजे ही झाडे देशी प्रजातीची असणे, बंधनकारक आहे.

ही झाडे कापण्यात येणार

अशोक, सीताफळ, लिंबू, पेरू, वड, आंबा, बदाम, उंबर, नारळ, रामफळ, कडुलिंब, चाफा, कांचन, कढीपत्ता, सोनमोहर, जांभूळ, शेवगा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news