Pradeep Purnekar Case: मीनाक्षी शिंदे यांनी सुपारी दिल्याची आरोपीकडून कबुली; राम पूर्णेकर यांचा दावा

पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यात राजकीय संघर्ष तीव्र
Pradeep Purnekar Case
Pradeep Purnekar CasePudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: प्रदीप पूर्णेकर हत्येला २९ दिवस होऊनही आरोपींसंदर्भांतील १६ व्हिडीओचा तपास विशेष पोलीस पथकाने केलेला नाही. आरोपी पप्प्या शिंदे याने खुनाची सुपारी मीनाक्षी शिंदे यांनीच दिली होती, असे दुसऱ्याच दिवशी पोलीस तपासात उघड केले होते.

आरोपींसोबत चहा पीत असणारा मीच आहे, असे राजेंद्र शिंदे यांनी पोलिसांकडे कबूल केले आहे, ती माहिती पोलीस तपासात दाखवत नाहीत, असा गंभीर आरोप राम पूर्णेकर आणि खुशबू पूर्णेकर यांनी आज पत्रकार परिषेदेत केला.

Pradeep Purnekar Case
Vishakha Raut: विशाखा राऊत यांचे अपील फेटाळले; कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल यांचा निर्णय

शिवसेना विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येतील पाच आरोपींना अटक करण्यात आली. मात्र मुख्य सूत्रधार माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अद्याप अटक झाली नाही. उलट पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी गेलेल्या राम पूर्णेकर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन नौपाडा पोलीस ठाण्यात आणले.

पूर्णेकर कुटुंब आणि त्यांच्या हितचिंतकांनी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या आंदोलन केले. मानपाडा येथे रास्तारोको करीत रात्रभर घोडबंदर रोडवर चक्काजाम करीत राज्य सरकरला हादरा दिला.

पूर्णेकर कुटुंबियांची समजूत काढून आज पोलिसांनी काय काय तपास केला आहे, याची माहिती घेण्यासाठी बोलावले होते. पूर्णेकर कुटुंबिय आणि विरोधी पक्षातील नेते मंडळी खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात गेले होते. एसआयटीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर पूर्णेकर कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस हे दबावाखाली शिंदे दाम्पत्यांना वाचवीत असल्याचा आरोप केला.

Pradeep Purnekar Case
Maharashtra Illegal Liquor Law: अवैध दारूविक्री रोखण्यासाठी कठोर कायद्याची मागणी; ड्रोन वापरण्याचाही प्रस्ताव

हत्याबाबतचे १६ व्हिडीओ पोलिसांना देऊनही अद्याप त्याचा तपास केलेला नाही. उलट आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे हे खुनाचे सूत्रधार कसे यासंदर्भातील १६ व्हिडीओ पोलिसांना देण्यात आलेले आहे.

त्यासंदर्भात पोलीस काहीच बोलत नसून आम्ही आरोपीना पकडले आहे, गुन्हा दाखल केले आहे, पुढील तपास सुरु असल्याचीच उत्तरे देत आहेत. त्यामुळे यापुढे आम्हीं पोलिसांकडे हात जोडण्यास जाणार नाही, आम्ही आमच्या मार्गाने न्याय मिळवू असे पूर्णेकर कुटुंबियांनी जाहीर केले आहे.

उत्तर पोलिसांनी १२ तासात आरोपी अटक केले आहेत, महाराष्ट्र पोलीस काय करीत आहेत ? पाचवा आरोपी हा डमी उभा करण्यात आला असून पोलिसांनी न्यायालयाला वेडे बनविले आहे, त्यामुळे त्यासंदर्भात आम्ही विचारलेल्या प्रश्नाबाबत काहीच उत्तर देत नाही, असे पूर्णेकर कुटुंबियांनी सांगितले.

एका पोलीस अधिकाऱ्याने महाराजा हॉटेल बाहेरील आरोपींसोबत राजेंद्र शिंदे हा चहा पीत असतानाचा व्हिडीओ आम्हाला दिला आहे. तो व्हिडीओ देखील पोलिसांनी कसा तपासला नाही. तपास अधिकाऱ्याने आमच्या वकिलाला सांगितले की राजेंद्र शिंदे यांनी कबुल केले की मी आरोपींसोबत चहा पीत होतो, त्याची माहिती देखील पोलिसांनी तपासात घेतलेली नाही.

एवढचं नाही तर खुनाच्या दुसऱ्या दिवशी आरोपी पप्प्या शिंदे याने खुनाची सुपारी ही मीनाक्षी शिंदे यांनीच दिली होती, अशी कबुली पोलीस अधिकाऱ्यांना दिलेली आहे. त्या आरोपीला शॉक ट्रीटमेंट दिल्यानंतर सुपारीची कबुली दिल्याचे पूर्णेकर यांनी सांगितले. एवढी माहिती असतानाही मुख्य सूत्रधारांना अटक केली जात नाही. आम्हाला कोण स्क्रिप्ट लिहून देईल, माझा बाप गेला आहे, असे राम पूर्णेकर यांनी खासदार नरेश म्हस्के यांचे आरोप खोडून टाकले.

आत्महत्या करावीशी वाटते : राम पूर्णेकर

बाबाच्या खुनाला २९ दिवस झाले. अजून आरोपी मोकाट फिरत आहेत. रात्री झोप लागत नाही. आम्ही तपास करून पुरावे असलेले १६ व्हिडीओ पोलिसांकडे दिले आहेत, तरी देखील कारवाई होत नाही. यातून मला वाटते की आता आत्महत्या करावी, अशी मानसिकता तयार झाली असल्याचे धक्कदायक वक्तव्य राम पूर्णेकर यांनी करून ठाणे पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे.

आज आदित्य ठाकरे घेणार पूर्णेकर कुटुंबियांची भेट

गुरुवारी विरोधी पक्ष आणि शिवसेनेला पोलिसांनी मोर्चा अथवा आंदोलन करण्यास परवानगी नाकारल्याने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे पूर्णेकर कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news