Flavoured Milk Students: सामाजिक न्याय विभागाच्या शाळांत मिळणार सुगंधी दूध; १५ सप्टेंबरपासून वितरण

१५ सप्टेंबर २०२६ पासून विद्यार्थ्यांना दुधाचे वितरण केले जाणार आहे.
Flavoured Milk
Flavoured MilkPudhari
Published on
Updated on

मुंबई: सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वसतिगृहे आणि शासकीय निवासी शाळांतील विद्यार्थ्याना आता दररोज २०० मिली सुगंधी दूध दिले जाणार आहे.

यासाठी राज्यस्तरीय ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पराग मिल्क फूड आणि श्री वारणा संघ लिमिटेड यांच्याकडून टेट्रा पॅक स्वरूपातील सुगंधी दुधाच्या वितरणास मान्यता देण्यात आली आहे. १५ सप्टेंबर २०२६ पासून विद्यार्थ्यांना दुधाचे वितरण केले जाणार आहे.

Flavoured Milk
Western Railway New Timetable: पश्चिम रेल्वे आजपासून नव्या वेळापत्रकाने धावणार; मुंबईकरांसाठी ६ नव्या लोकल, २ एसी लोकल

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची राज्यात ४४९ शासकीय वसतिगृहे कार्यरत असून, त्यांची एकूण प्रवेश क्षमता ४६ हजार ६६३ विद्यार्थी इतकी आहे. याशिवाय अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुला-मुलींसाठी ९२ शासकीय निवासी शाळांची प्रवेश क्षमता १८ हजार ६०० इतकी आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना सकस आणि पौष्टिक आहार देण्याच्या व्यवस्थेचा भाग म्हणून टेट्रा पॅकमधील सुगंधी दुधाचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या स्थानिक पातळीवर साखर मिश्रित दूध पुरवठा करण्याची व्यवस्था बंद करण्यात येणार आहे.

सामाजिक न्याय विभागाची शासकीय वसतिगृहे आणि शासकीय निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सध्या सकाळचा नाश्ता, दूध, दोन वेळचे जेवण, उकडलेली अंडी, शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी कॉर्न फ्लेक्स, दररोज एक सफरचंद तसेच ऋतुमानानुसार एक फळ देण्यात येते.

Flavoured Milk
Mumbai SIR Voter List: मुंबईत ३६ लाख मतदार वगळले; राज्‍याच्या मतदार यादीत तब्बल २.७ कोटी मतदारांची घट

त्यामध्ये साखरमिश्रित दुधाच्या जागी आता टेट्रा पॅकमधील सुगंधी दुधाची भर पडली आहे. त्यासाठी पराग मिल्क फूडला मुंबई, नाशिक, पुणे आणि लातूर विभागातील तर श्री वारणा संघ लिमिटेडला नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील वसतिगृहे आणि निवासी शाळांसाठी दूधपुरवठा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

दूध पुरवठ्याचा कालावधी तीन वर्षांचा राहणार असून या कालावधीत मंजूर केलेल्या २६ रुपये ४० पैसे या दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही. दूधाच्या गुणवत्तेबाबत कडक अटी घालण्यात आल्या असून निविदेतील अटींचा भंग केल्यास पुरवठादाराला दंड करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news