Ganpati Reel: कंटेट क्रिएटर्सना बाप्पा पावणार; राज्य सरकारतर्फे गणेशोत्सव रीलस्पर्धा, बक्षिसाची रक्कम, नियम- अटी काय?

Ganpati Reel Competition prize: राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्यास तब्बल एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.
Ganpati Reel Competition
Ganpati Reel CompetitionPudhari
Published on
Updated on

Maharashtra Government Ganeshotsav Reel Competition How to Apply

मुंबई: बुधवारपासून राज्यभरात गणेशोत्सवाला सुरूवात झाली असून यानिमित्त राज्याच्या सांस्कृतिक कार्यविभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यावतीने गणेशोत्सव रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्यास तब्बल एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागासाठी २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नावनोदणी आणि रील अपलोड करायचे आहेत.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री  अॅड .आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून राज्यातील गणेशोत्सवाला देश-विदेशात नवे आयाम मिळावे यासाठी रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे नियम, अर्ज कसा करावा आणि पारितोषिक किती हे जाणून घेऊया.   

Ganpati Reel Competition
Ganesh Puja: घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करावे का?

गणेशोत्सव रील स्पर्धेत कोणत्या विषयावरचे रील चालतील?

रीलसाठी पर्यावरण संवर्धन, स्वदेशी, गडकिल्ले, संस्कृती, ऑपरेशन सिंदूर या थीम मध्यवर्ती ठेवून ३० सेकंद ते ६० सेकंदापर्यंत रील बनविणे अपेक्षित आहे. 

पारितोषिक किती रुपयांचे?

महसूल विभागीय स्तरावरील विजेत्या स्पर्धकाला प्रथम पारितोषिक म्हणून  २५  हजार रुपये, द्वितीय पारितोषिक रुपये १५ हजार, तृतीय पारितोषिक १० हजार, उतेजनार्थ विजेत्यास ५ हजार अशा स्वरुपात पारितोषिक दिले जाईल.

या स्पर्धेतील राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास १ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक म्हणून ७५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक म्हणून ५० हजार रुपये, उतेजनार्थ पारितोषिक म्हणून २५ हजार रुपये देण्यात येईल.

महाराष्ट्र व भारताबाहेरील विजेत्या गटातील स्पर्धकाला प्रथम क्रमांकाचे १ लाख रुपये बक्षीस, द्वितीय क्रमांकासाठी ७५ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५० हजार रुपये, उतेजनार्थ म्हणून २५ हजार रुपये देण्यात येतील.

स्पर्धेसाठी अर्ज कसा करावा?

स्पर्धेची नोंदणीकरिता गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.  स्पर्धेची नोंदणी ऑनलाईन अर्जाद्वारेच करता येणार आहे.

तसेच filmcitymumbai.org या संकेतस्थळावर तसेच महामंडळाच्या सोशल मीडिया हँडल्सवरही हा फॉर्मची लिंक उपलब्ध आहे.

सांस्कृतिक विभागाच्या गणेशोत्सव स्पर्धेसाठीच्या नियम व अटी काय आहेत?

1. स्पर्धेची नोंदणी ऑनलाईन अर्जाद्वारे करावी.

2. स्पर्धकांनी घरगुती किंवा सार्वजनिक ठिकाणांच्या गणेशोत्सवाच्या रील तयार करणे आवश्यक राहील.

3.रील शूट करताना, कोणत्याही सार्वजनिक मंडळाचे, सार्वजनिक ठिकाणाचे चित्रीकरण करणार असाल तर संबंधित मंडळाची परवानगी घेणे आवश्यक आहे, मंडळांनी आपल्या रील वर आक्षेप घेतल्यास सदर स्पर्धकाला बाद करण्यात येईल.

Ganpati Reel Competition
Ganesh Puja: वाडा कोलम की आंबेमोहोर? मोदकांसाठी कोणता तांदूळ योग्य?

4. रील RATIO १६:२ म्हणजेच उभा (व्हर्टिकल) असावा.

5. स्पर्धकांनी स्वतःच्या INSTAGRAM व FACEBOOK हॅन्डल्सवर रील्स पोस्ट करणे बंधनकारक राहील. रिल पोस्ट करताना फिल्मसिटी मुंबईच्या ऑफिशियल INSTAGRAM आणि FACEBOOK हॅण्डलला COLLAB करणे बंधनकारक आहे.

6. स्पर्धकांनी कोणत्या विषयाला अनुसरून रील तयार केली आहे याचं थोडक्यात वर्णन करावं.

7. अर्जामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम माध्यमातून अपलोड केलेल्या रीलची लिंक योग्य पद्धतीने भरावी.

8. रील तयार करताना सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.

9. रिल्सवर कृत्रिम पध्दतीने लाईक, व्ह्यूज वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यास स्पर्धकास बाद ठरविण्यात येईल. रिल्सवर कृत्रिम पध्दतीने लाईक, व्ह्यूज वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यास स्पर्धकास बाद ठरविण्यात येईल.

10. स्पर्धेत कोणत्याही टप्यावर बदल अथवा स्पर्धा रद्द करण्याचा सर्वाधिकार महामंडळ राखून ठेवत आहे.

11. परिक्षकांनी दिलेला निकाल अंतिम असेल.

अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घ्या.

1.      विभागीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, आपण ज्या ठिकाणी चित्रीकरण करणार आहात,किंवा ज्या ठिकाणावरील गणपती बाप्पा रीलमध्ये दिसेल त्या विभागातून आपली नोंदणी करावी लागेल. (म्हणजे आपण पुण्यात राहत असाल, आणि रील रत्नागिरीतील गणपती बाप्पाची असेल तर आपला विभाग रत्नागिरी म्हणजेच कोकण महसूल विभाग ग्राह्य धरला जाईल.)

2.      राज्यस्तरीय स्पर्धेसाठी वेगळी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, विभागीय पातळीवरील स्पर्धकांमधूनचराज्यस्तरीय विजेत्यांची घोषणा केली जाईल.

3.      तिन्ही गटांसाठी एकच नोंदणी अर्ज असून त्यात एका स्पर्धकाने एकदाच नोंदणी करावी.

4.      नोंदणी अर्जामध्ये आपल्या राज्याचा / देशाचा योग्य उल्लेख करावा.

5.      गणपती बाप्पा चे स्थळ समजावे याकरिता चित्रीकरणादरम्यान गुगल टॅग फोटो अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे

गणेशोत्सव रील स्पर्धेत स्पर्धकांनी कोणत्या गोष्टी करू नये?

1.      सार्वजनिक मंडळाची परवानगी न घेता चित्रीकरण करू नये.

2.      रील मध्ये अश्लील,धार्मिक भावना दुखावणारे,वादग्रस्त मजकूर दृश्य ठेवू नये.

3.      ६० सेकंदांपेक्षा जास्त किंवा ३० सेकंदांपेक्षा कमी कालावधीची रील तयार करू नये.

4.      HORIZONTAL (आडवे) व्हिडिओ शूट करू नये;फक्त VERTICAL (उभा) स्वरूप मान्य आहे.

Ganpati Reel Competition
Ganpati Temples Around World: मॉरिशस, जपान ते व्हिएतनाम.... जगभरातील बाप्पाची रूपे

5.      रील अपलोड करताना FILMCITY MUMBAI हँडलला COLLAB न केल्यास सहभाग ग्राह्य धरला जाणार नाही.

6.      इतरांचा कॉपीराइट असलेला व्हिडिओ, फोटो विनापरवानगी वापरू नये.

7.      रील पोस्ट केल्यानंतर विहित नमुन्यात आणि कालमर्यादेत स्पर्धा अर्ज भरला गेला नाही तर स्पर्धेतील सहभाग अमान्य ठरेल.

8.      स्पर्धकांने खोटी माहिती, चुकीची लोकेशन किंवा बनावट परवानगी दाखवू नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news