गणपती बाप्पाचे आगमन अगदी काही दिवसांवर आले आहे.बाप्पा आणि मोदक अतूट समीकरण आहे.उकडीचे मोदक करताना कोणत्या तांदूळाची पिठी वापरावी हा प्रश्न अनेकांना पडतो आम्ही आज याचे उत्तर देणार आहोत.कारण अनेकदा योग्य पिठी न घेतल्याने मोदक बिघडण्याची शक्यता असते.बाजारात विकतचे पीठ देखील मिळते.मोदकांसाठी कोलम किंवा नवीन तांदूळ वापरू नये.इंद्रायणी तांदळाचे मोदक चिकट होतात तर बासमतीचे फार कोरडे होतात.त्यामुळे तुम्ही आंबेमोहोर तांदूळाची पिठी उकडीचे मोदक बनवण्यासाठी वापरू शकता.याने बनवलेले मोदक मऊ होतात