

Cabinet Meeting After Ajit Pawar Death: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्यात कॅबिनेट मंत्रीमंडळ्याच्या बैठकीत अजित पवारांनी पाठपुरावा केलेल्या तीन महत्वाच्या निर्णयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.
आज (दि. १० फेब्रुवारी) मुंबईत अजित पवार यांच्या पश्चात पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यापूर्वी दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. यानंतर कॅबिटने मंत्रीमंडळ बैठक पार पडली.
या बैठकीत कॅबिनेटने बारामती इथं ७५ कोटी रूपयांचे क्रीडा संकुल उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. तसंच वालचंदनगर - रत्नापूर MIDC साठी देखील १००० एकर जागा उपलब्ध करून देण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात ११ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची सुचना देखील केली होती. त्याप्रमाणं आजच्या मंत्रीमंडळात ११ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला आहे.
या सर्व निर्णयांसाठी अजित पवार यांनी निधनापूर्वी काही दिवस आधी महसूलमंत्र्यांकडे याचा पाठपुरावा केला होता. यानंतर आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इंदापूरमधील एमआयडीसीचा मार्ग मोकळा झाल्याची घोषणा केली. त्यांनी रत्नपूर एमआयडीसीसाठी एक हजार एकर जागा देण्याचा निर्णय राज्यमंत्रीमंडळात झाल्याचं जाहीर केलं.
दरम्यान, आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपला पदभार स्विकारण्यापूर्वी मुंबईत सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतरची ही पहिलीच कॅबिनेट बैठक होती. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांचे फक्त शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आलं.
सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्या दिल्लीला खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी जाणार आहेत. त्यावेळी त्या गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी राज्यातील भविष्यातील राजकारणाविषयी देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस देखील दिल्लीचा दौरा करून आल्याची चर्चा आहे.