Maharashtra BJP: भाजप कार्यकारिणीत पडळकर, उपाध्येंवर मोठी जबाबदारी, नवनाथ बन यांना बढती

नव्या कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १२ चिटणीस आणि विविध आघाडी प्रमुख अशा ४३ जणांचा समावेश आहे.
BJP State Executive
BJP State ExecutivePudhari
Published on
Updated on

मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल 8 महिन्यांनी रविंद्र चव्हाण यांनी राज्य कार्यकारिणीची घोषणा मंगळवारी केली. या कार्यकारिणीत आमदार गोपीचंद पडळकर, केशव उपाध्ये यांच्यावर उपाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर उपाध्ये यांच्या जागी मुख्य प्रवक्ते म्हणून नवनाथ बन यांना बढती देण्यात आली आहे. कृष्णराज महाडिक यांना भाजप युवा मोर्चा अध्यक्षपद देण्यात आले आहे. तर माजी खासदार सुजय विखे, रामदास तडस आणि चित्रा वाघ यांनाही कार्यकारिणीत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

BJP State Executive
Ravindra Chavan: 'टीम रविंद्र चव्हाण'मध्ये कुणाची वर्णी लागणार? प्रदेश भाजप कार्यकारिणीची मंगळवारी घोषणा

राज्यातील लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. मिहीर कोटेचा यांची कोषाध्यक्ष, अरुण लखानी यांची सह कोषाध्यक्ष, रवींद्र अनासपुरे यांची मुख्यालय प्रभारी, विश्वास पाठक यांची मुख्यालय सहप्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १२ चिटणीस आणि विविध आघाडी प्रमुख अशा ४३ जणांचा समावेश आहे. जुन्या कार्यकारिणीतील काही नेत्यांना बढती देण्यात आली आहे. तर काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. २०२९ सालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, सर्व घटकांचा समावेश असलेली कार्यकारिणी भाजपने जाहीर केली आहे.

BJP State Executive
BJP Maharashtra politics | महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचा निर्णायक उदय

केशव उपाध्ये (मुंबई), गोपीचंद पडळकर (पश्चिम महाराष्ट्र), सुजय विखे (उत्तर महाराष्ट्र), भारती पवार (उत्तर महाराष्ट्र), रामदास तडस (विदर्भ), प्रवीण पोटे (विदर्भ), संजय भेंडे (विदर्भ), अतुल काळसेकर (कोकण), संजय कोळगे (मराठवाडा), अर्चना पाटील चाकुरकर (मराठवाडा) चैतन्यबापू देशमुख (मराठवाडा) आणि प्रिया शिंदे (पश्चिम महाराष्ट्र) अशा १२ जणांवर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्य प्रवक्ते म्हणून केशव उपाध्ये यांच्या जागी नवनाथ बन यांना बढती देण्यात आली आहे. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम असून, ज्यांना या यादीत स्थान मिळालेले नाही, त्यांना आगामी काळात संघटनेच्या इतर कामात सामावून घेतले जाईल, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिली.

BJP State Executive
BJP Mayor of Mumbai: भाजपचा मुंबई महापौर पहिला की दुसरा ?

भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक, महिला मोर्चा अध्यक्षपदी चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी योगेश टिळेकर, किसान मोर्चा अध्यक्षपदी रामकृष्ण वेताळ, एससी मोर्चा अध्यक्षपदी विश्वजीत गायकवाड, एसटी मोर्चा अध्यक्षपदी देवराव होळी, भटके विमुक्त मोर्चा अध्यक्षपदी नरेंद्र पवार आणि अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी इद्रिस मुलतानी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे -

भाजप सरचिटणीस -

  1. निरंजन डावखरे (कोकण)

  2. संजय कुटे (विदर्भ)

  3. माधवी नाईक (कोकण)

  4. राजेश पांडे (पश्चिम महाराष्ट्र)

  5. सुनील राणे (मुंबई)

  6. योगेश सागर (मुंबई)

भाजप चिटणीस -

  1. प्रशांत ठाकूर (कोकण)

  2. संतोष जनाटे (कोकण)

  3. मंगेश चव्हाण (उत्तर महाराष्ट्र)

  4. रोहिणी नायडू (उत्तर महाराष्ट्र)

  5. भैरवी वाघ (उत्तर महाराष्ट्र)

  6. परिणय फुके (विदर्भ)

  7. अर्चना डेहनकर (विदर्भ)

  8. राम सातपुते (पश्चिम महाराष्ट्र)

  9. वर्षा डहाळे (पश्चिम महाराष्ट्र)

  10. संजय जगताप (पश्चिम महाराष्ट्र)

  11. प्रविण घुगे (मराठवाडा)

  12. रेखा कुलकर्णी (मराठवाडा)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news