Ravindra Chavan: 'टीम रविंद्र चव्हाण'मध्ये कुणाची वर्णी लागणार? प्रदेश भाजप कार्यकारिणीची मंगळवारी घोषणा

आता प्रदेश कार्यकारिणीची अंतिम यादी निश्चित करण्यात आली असून, उद्या मंगळवारी त्याबाबतची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.
Ravindra Chavan
Ravindra ChavanPudhari
Published on
Updated on

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील प्रदेश भाजपची कार्यकारिणी मंगळवारी जाहीर होणार आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नव्या प्रदेश कार्यकारिणीला मंजुरी दिली आहे. 2029 सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, नव्या कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.

Ravindra Chavan
Ravindra Chavan : भाजपच्या विचारधारेच्या उगमस्थानीच 'मराठी'; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विरोधकांवर प्रहार

गेल्यावर्षी जुलै महिन्यात रविंद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मात्र ८ महिने उलटले तरी नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर झालेली नव्हती. त्यात लागोपाठ नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागल्याने कार्यकारिणीची घोषणा लांबणीवर पडली. सत्तेत असूनही संघटनात्मक नियुक्त्या रखडल्याने भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. प्रदेश भाजपने केंद्रीय नेतृत्वाकडे मंजुरीसाठी पाठवलेली यादी दोनवेळा परत आली. केंद्रीय नेतृत्वाने त्यातील काही नावांमध्ये सुधारणा सुचवल्या. त्यानुसार आता प्रदेश कार्यकारिणीची अंतिम यादी निश्चित करण्यात आली असून, उद्या मंगळवारी त्याबाबतची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.

Ravindra Chavan
Ravindra Chavan : महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ होणार

भाजपमधील जुने, निष्ठावंत कार्यकर्ते आणि इतर पक्षांतून आलेले नेते यांच्यात पदे मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. सर्वांना सामावून घेताना नेतृत्वाची दमछाक होत आहे. विधानसभा आमदारांना कार्यकारिणीत स्थान देऊ नये. त्याऐवजी विधान परिषदेच्या आमदारांकडे पुरेसा वेळ असल्याने त्यांना संघटनात्मक कामांसाठी वेळ देणे शक्य आहे, असा युक्तिवाद केला जात आहे. राज्यातील प्रत्येक विभागासाठी प्रभारी नेमावा, असा प्रस्तावही प्रदेश भाजपकडून पाठवण्यात आला होता. मात्र पक्षाच्या घटनेत तशी तरतूद नसल्याचे कारण देत केंद्रीय नेतृत्वाने हा प्रस्ताव फेटाळला. विभागवार प्रभारी नेमण्याऐवजी ती जबाबदारी विभागीय संघटन मंत्र्यांकडे सोपवावी, असाही विचार पुढे आला आहे.

Ravindra Chavan
Ravindra Chavan : भाजप बंडखोरांना प्रदेशाध्यक्षांचा ‌‘अल्टिमेटम‌’

नुकत्याच झालेल्या नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सरस कामगिरी करणाऱ्यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान देऊन बक्षिसी दिली जाणार आहे. एवढेच नाही तर 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीच्या दृष्टीने नवी कार्यकारिणी निवडली जाणार आहे.

Ravindra Chavan
Ravindra Chavan : अंबरनाथ काँग्रेसमुक्त करून दाखवले
Summary
  • ८ महिन्याच्या 'वेटिंग'नंतर कार्यकारिणीला मंजुरी

  • प्रदेश भाजपने पाठवलेल्या यादीत दोनवेळा सुधारणा

  • निष्ठावंत आणि इतर पक्षांतून आलेल्यांना सामावून घेण्याची कसरत

  • २०२९ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकारिणीत स्थान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news