Lalbaugcha Raja Aid: दुःखाच्या प्रसंगी लालबागचा राजा धावला! भुलेश्वरच्या राजा मंडळाला ११ लाखांची मदत

Lalbaugcha Raja financial aid Bhuleshwar Cha Raja: भुलेश्वरच्या राजाला लालबागच्या राजाचा मदतीचा हात; मंडळाला ११ लाख, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख
Lalbaugcha Raja
Lalbaugcha RajaPudhari
Published on
Updated on

मुंबई: दक्षिण मुंबईतील भुलेश्वर येथील ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळावर शोककळा पसरली आहे.

२२ फूट उंच गणेशमूर्तीचा तोल जाऊन ती कोसळल्याने मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि गणेशभक्त ब्रिजेश जोशी यांचा मृत्यू झाला, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर लालबाग येथील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला मदतीचा हात देत वडिलकीच्या नात्याने आर्थिक पाठबळ दिले आहे.

Lalbaugcha Raja
Neville Dsouza Football Ground: नेव्हिल डिसोझा मैदान आरक्षण बदल येणार अंगलट! प्रशासन व सभागृह येऊ शकते अडचणीत

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला ११ लाख रुपयांचा मदतनिधी जाहीर करण्यात आला आहे. तसेच दुर्घटनेत मृत्यू झालेल्या संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

Lalbaugcha Raja
Cabinet Decisions: महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; दोन आरोग्य विद्यापीठांना मंजुरी, लाडक्या बहिणींसाठी साडेतीनशे कोटी

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी या मदतीची घोषणा केली.

गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या दुर्घटनेने गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त होत असताना, लालबागच्या राजाने पुढे केलेल्या मदतीच्या हातामुळे भुलेश्वरचा राजा मंडळ आणि मृतांच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news