Khopoli Ayush Cancer Research Center: खोपोलीत आयुष संशोधन केंद्र व १०० खाटांचे रुग्णालय; कर्करोग उपचारासाठी ३०० कोटींचा प्रकल्प

टाटा मेमोरियल सेंटर व ॲक्ट्रेकच्या सहकार्याने २० औषधी वनस्पतींवर संशोधन; जानेवारी २०२७ पासून रुग्णसेवा
Khopoli Ayush Cancer Research Center
Khopoli Ayush Cancer Research CenterPudhari
Published on
Updated on

मुंबई : कर्करोग उपचारासाठी आयुर्वेदिक व पारंपरिक औषधी वनस्पतींवर आधारित संशोधनाला चालना देण्यासाठी खोपोली येथे आयुष संशोधन केंद्र आणि 100 बेडचे रुग्णालय उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी आयुष मंत्रालयाने 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, सप्टेंबरपर्यंत इमारतीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. जानेवारी 2027 पासून या ठिकाणी रुग्णसेवा सुरू होणार आहे.

Khopoli Ayush Cancer Research Center
Bombay High Court Promotion: पदोन्नतीत सेवाज्येष्ठताच निर्णायक; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

टाटा मेमोरियल सेंटर व ॲक्ट्रेकच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या या केंद्रात कर्करोग उपचारासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या 20 औषधी वनस्पती सूचीबद्ध करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 10 वनस्पतींवर प्रयोगशाळांमध्ये चाचण्या सुरू असून पुढील टप्प्यात प्राण्यांवर प्रयोग आणि त्यानंतर सुमारे 200 रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल घेतली जाणार आहे.

देशभरातील सुमारे 1,500 औषधी वनस्पतींचा संग्रह करून त्यांचे वैज्ञानिक मूल्यमापन करण्यात येणार असून, त्यापैकी 200 वनस्पतींची लागवड खोपोलीतील 9 हेक्टर जमिनीवर केली जाणार आहे.

Khopoli Ayush Cancer Research Center
Mundhwa Land Scam Maharashtra: मुंढवा जमीन घोटाळा: दुय्यम निबंधक तारू व तहसीलदार येवले बडतर्फीच्या मार्गावर

या संशोधनात हळद, अश्वगंधा, गिलोय, बाबची यांसह विविध औषधी घटकांवर अभ्यास सुरू असून, ॲलोपॅथीसोबत आयुर्वेदाचा संगम साधून उपचार प्रभावी करण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

ॲक्ट्रेकच्या क्लिनिकल रिसर्च सेंटरचे उपसंचालक डॉ. नवीन खत्री यांनी सांगितले की, एकात्मिक उपचार पद्धतींचे महत्त्व सिद्ध करण्यासाठी प्रणालीबद्ध क्लिनिकल चाचण्या आणि वास्तव परिस्थितीतील अभ्यास अत्यावश्यक आहेत.

Khopoli Ayush Cancer Research Center
AI Stock Market Fear | एआयच्या भीतीने शेअर बाजारात दाणादाण; सेन्सेक्स 1048 अंकांनी कोसळला

आयुषमधील अनेक औषधी वनस्पतींमध्ये कर्करोग उपचारांना पूरक ठरण्याची मोठी क्षमता आहे. या घटकांची ओळख, त्यांची कार्यपद्धती, सुरक्षितता आणि परिणामकारकता यांचा शास्त्राधारित अभ्यास आम्ही पद्धतशीरपणे करत आहोत. प्रयोगशाळा ते रुग्णसेवा असा संपूर्ण प्रवास पार करत रुग्णांना लाभ होईल अशी औषधे विकसित करणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

डॉ. विक्रम गोटा, प्रमुख संशोधक,आयुष केंद्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news