Mundhwa Land Scam Maharashtra: मुंढवा जमीन घोटाळा: दुय्यम निबंधक तारू व तहसीलदार येवले बडतर्फीच्या मार्गावर

१८०० कोटींच्या भूखंड व्यवहारात अनियमितता; दोन्ही अधिकाऱ्यांना नोटिसा, राज्य सरकारचा कठोर पवित्रा
Land Scam
Land ScamPudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंढवा जमीन विक्री प्रकरणात कागदपत्रांची कोणतीही तपासणी न करता दस्ताची नोंदणी केल्याप्रकरणी निलंबित झालेले पुणे येथील दुय्यम निबंधक राजेंद्र तारू व तहसीलदार सूर्यकांत येवले यांना आता सेवेतून बडतर्फ केले जाणार असून, दोघांनाही तशा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

Land Scam
AI Stock Market Fear | एआयच्या भीतीने शेअर बाजारात दाणादाण; सेन्सेक्स 1048 अंकांनी कोसळला

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने मुळशी तालुक्यातील मौजे मुंढवा येथे आयटी पार्क व डाटा सेंटर उभारण्यासाठी बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात असलेली 40 एकर सरकारी जमीन खरेदी केली. महार वतनाची जमीन असलेला हा 1800 कोटी रुपये किमतीचा भूखंड केवळ 300 कोटी रुपयांना त्यांनी खरेदी केला. हे प्रकरण उघडकीस येताच तारू आणि येवले यांना निलंबित करण्यात आले.

Land Scam
Promotion High Court Decision | पदोन्नती ही नियुक्तीच्या तारखेवर आधारित नसते; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

आता त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यापूर्वी पोलिस प्रशासन आणि विधी व न्याय विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आला आहे. पोलिस प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात ही कारवाई करताना कलम 311 चा वापर केला जातो. अशा कारवाईला कोणी आव्हान दिले असल्यास न्यायालयात काय उत्तर दिले, प्रशासनाने कोणती पावले उचलली आदी माहिती घेऊनच राज्य सरकार पुढील पाऊल टाकणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news