Kedarnath Ganpati Decoration: गणेशासोबत विनातिकीट रोपवेने केदारनाथला जायचे आहे का? सांताक्रुजच्या घरातील गणपतीचा देखावा ठरला आकर्षण

मकवाना कुटुंबाचा गणपती बाप्पा केदारनाथ रोपवेच्या थीममध्ये विराजमान
Kedarnath Ganpati Decoration
Kedarnath Ganpati DecorationPudhari
Published on
Updated on

विशाल नाईक

जोगेश्वरी: सांताक्रुज येथील इंटीरियर डिझाइनर दीपक मकवाना दरवर्षी आपल्या घरी अत्यंत नाविन्यपूर्ण, पर्यावरणपूरक व अनोख्या थीमवर आधारित गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी प्रसिद्ध आहेत.

यंदाही घरगुती गणपती उत्सवासाठी केदारनाथ रोपवे ही एक अतिशय सुंदर, नाविन्यपूर्ण व भक्तीमय थीमचा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. केदारनाथ (देवभूमी)चे पवित्र वातावरण व त्यात रोपवेची आधुनिक जोड यामुळे देखावा खूपच आकर्षक दिसत आहे.

इंटिरियर डिझायनर दीपक मकवाना हे गेल्या ३५ वर्षांपासून गणेश चतुर्थीनिमित्त दरवर्षी नव्या थीमवर आपले घर सजवत आहेत. मकवाना कुटुंबाची प्रत्येक सजावट भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात येते. दरवर्षी घरात भारतातील प्रमुख विकास प्रकल्पांची हुबेहूब प्रतिकृती तयार करतात. यावर्षी त्यांनी केदारनाथ रोप-वे प्रकल्प उभारला आहे.

जर तुम्हाला तिकीटाशिवाय केदारनाथ धामला प्रत्यक्ष आकाराच्या रोप-वे केबल-कारमध्ये बसून जायचे असेल, तर मकवाना कुटुंबाकडे आलेल्या बाप्पाचे दर्शन घ्या.

Kedarnath Ganpati Decoration
Ghatkopar Bhatwadi Ganeshotsav: ८ फूट बाप्पा अन् AIचा अनोखा देखावा! घाटकोपरच्या भटवाडी मंडळाचा गणेशोत्सव ठरतोय खास

सध्या केदारनाथच्या तीर्थयात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. यात्रेकरू घोड्यावरून, पायी किंवा हेलिकॉप्टरच्या मदतीने केदारनाथला पोहोचतात. जे पायी जातात त्यांना सुमारे १६ तासांचा प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात हेलिपॅडची सुविधाही बंद असते.

हे सर्व अडथळे दूर करण्यासाठी भारत सरकारने पर्वतमाला प्रकल्पांतर्गत केदारनाथ रोपवे प्रकल्प हाती घेतला आहे.शासनाने हाती घेतलेला हा प्रकल्प सध्या अंतिम टप्प्यात आहे. पण इंटिरियर डिझायनर दीपक मकवाना यांनी हा प्रकल्प गणपती बाप्पासाठी रोप-कारच्या वेगाने आधीच उभा केला आहे.

मकवाना म्हणाले, अंदाजे १५ किमी लांबीचा रोपवे बांधला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हायला काही वर्षे लागतील. एकदा हा प्रकल्प तयार झाला की, भाविकांसाठी केदारनाथची यात्रा खूप सुलभ होईल. आता या प्रकल्पाच्या आराखड्याचा तपशील अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. त्याच्या आधारे, मी माझ्या घरी बाप्पासाठी केदारनाथ रोपवे प्रकल्प तयार केला आहे.

दीपक मकवाना यांनी एक रोपवे स्टेशन तयार केले आहे आणि त्याच्या शेजारी प्रत्यक्ष आकाराची एक रोपवे केबल कार तयार केली आहे. ज्यामध्ये सहा भाविक प्रवास करू शकतात. जणू काही सहाजण केबल कारमध्ये बसून आपल्या वडिलांना त्यांच्या वडिलांकडे घेऊन जात आहेत, असा भास होतो.

Kedarnath Ganpati Decoration
Panvel Gauri Festival: गौराईच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली; आरासीसाठी फुलांच्या माळा, तोरणांसह गजऱ्यांना विशेष स्थान

पंधरा-वीस दिवसांपूर्वी पवित्र श्रावण महिना सुरू असताना मकवाना यांनी घरी केदारनाथ धामचा रोपवे तयार करायचे ठरवले आणि मग त्यांच्या कुटुंबाने हा प्रकल्प साकारण्यास सुरुवात केली. दीपक यांच्या मुलांनीही जणू शाळेचाच प्रकल्प असल्याप्रमाणे उत्साहाने या कामात सहभाग घेतला.

दीपक मकवाना यांच्या गेल्या काही वर्षांतील प्रसिद्ध गणपती सजावट थीम्स

२०२५ - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ थीम: विमानतळाच्या प्रतिकृतीसह बोर्डिंग पास व आकर्षक सजावट केली होती.

२०२४ - फायटर जेट (युद्धविमान) थीम: भारतीय वायुसेनेच्या फायटर जेटची हुबेहूब प्रतिकृती तयार केली होती. यात लाईट्स आणि हलणारे भाग (moving flaps) विशेष आकर्षण होते.

२०२३ - वंदे भारत एक्सप्रेस थीम: शाडू मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तीसोबत त्यांनी 'वंदे भारत ट्रेन'ची सुंदर सजावट साकारली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news