Panvel Gauri Festival: गौराईच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली; आरासीसाठी फुलांच्या माळा, तोरणांसह गजऱ्यांना विशेष स्थान

गौराईच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलच्या जुन्या भाजी मार्केटमध्ये रंगबिरंगी फुलांची मोठी आवक झाली आहे. कमळांसह गुलाब, झेंडू, मोगरा, जाई-जुई आणि विविध फुलांच्या वेणी-गजऱ्यांना महिलांकडून मोठी मागणी आहे.
Panvel Gauri Festival
Panvel Gauri FestivalPudhari
Published on
Updated on

खांदा कॉलनी: श्री गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. आता घराघरांत गौराईच्या आगमनाचे वेध लागले असून, गौराईच्या स्वागतासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे.

गौराईची आरास, पूजा आणि सजावट आकर्षक करण्यासाठी पनवेलच्या जुन्या भाजी मार्केटमध्ये विविध प्रकारची रंगबिरंगी फुले मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत.

गौराईच्या सजावटीसाठी फुलांना विशेष महत्त्व असल्याने सकाळपासूनच बाजारात फुलांची खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे. फुलांच्या दुकानांमध्ये गुलाब, झेंडू, शेवंती, मोगरा, जाई, जुई, अबोली, जास्वंद, तगर, निशिगंध यांसह विविध प्रकारची फुले विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. फुलांच्या आकर्षक रंगांमुळे संपूर्ण बाजारपेठेला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे.

Panvel Gauri Festival
Raigad Teacher Recruitment: तरुण शिक्षकांच्या प्रवेशाने ग्रामीण शिक्षणाला नवी ऊर्जा; रायगडमध्ये पवित्र पोर्टलमधून ३५१ उपशिक्षकांची निवड

यंदा कमळांनाही विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. गुलाबी कमळ, पांढरे कमळ, लाल कमळ, पिवळ्या छटांचे कमळ तसेच विविध आकारांतील कमळे बाजारात उपलब्ध झाली आहेत. गौराईच्या पूजेसाठी आणि सजावटीसाठी कमळांचा वापर केला जात असल्याने ग्राहकांकडून कमळांची आवर्जून खरेदी केली जात आहे.

गौराईच्या आरासीत फुलांच्या माळा, तोरणे आणि गजऱ्यांना विशेष स्थान आहे. त्यामुळे मोगरा, जाई-जुई आणि मिश्र फुलांच्या वेणी-गजऱ्यांनाही मोठी मागणी आहे. मात्र फुलांची वाढलेली मागणी आणि आवक यामुळे वेणी-गजऱ्यांच्या दरात वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Panvel Gauri Festival
BMC Plastic Fine: प्रतिबंधित प्लास्टिकवर मनपाची कारवाई; ९.४० कोटींचा दंड वसूल, १२२ टन प्लास्टिक जप्त

गौराईच्या स्वागतासाठी घरातील सजावट करण्याबरोबरच पूजेची तयारी, नैवेद्य आणि आरास यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठेत गर्दी करत आहेत. अनेक महिला फुलांच्या रंगसंगतीनुसार गौराईची आरास करण्यासाठी फुले आणि कमळांची निवड करताना दिसत आहेत.

दीड दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर काही तासांतच पनवेल बाजारपेठेत गौराईच्या आगमनाची लगबग सुरू झाल्याने गणेशोत्सवातील भक्ती आणि उत्साहाचा माहोल कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गौराईच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली असून, फुलांच्या सुगंधाने आणि रंगबिरंगी फुलांनी बाजारपेठ अधिकच खुलून दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news