

Iran in Mumbai Instagram post Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पॉडकास्टमध्ये भारत आणि चीन या दोन देशांचा संस्कृतींचा अनादर केला होता. या देशांना नरकाचं द्वार संबोधून वाचाळवीर डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगळ्याच वादाला तोडं फोडलं होतं. यावर भारतानं डोनाल्ड ट्रम्प यांची दखल न घेणंच पसंत केलं तर इराणने भारत आणि चीनची बाजून घेऊन आपल्या हटके स्टाईलने डोनाल्ड ट्रम्प यांचे डोके ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न केला.
सध्या सोशल मीडियावर इराण इन मुंबई या अकाऊंटची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये महाराष्ट्राची एक बाजू असे हेडिंग असलेला व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्या व्हिडिओत भारताची आर्थिक राजधानी मुंबईमधील सुबत्ता दाखवणारी एक क्लिप आहे. त्याच जोडीला मुंबईतील गणपती उत्सव देखील दाखवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राला लाभलेला सह्याद्री रांगांचा नैसर्गिक खजिन्याचं देखील दर्शन घडवण्यात आलं आहे.
या नयनरम्य व्हिडिओला इराण इन मुंबईने 'कोणीतरी डोनाल्ड ट्रम्पसाठी कल्चरल डिटॉक्सचं वन वे तिकीट बूक करा. किमान त्यांची ही असंबंध बडबड तरी बंद होईल.' असे कॅप्शन देण्यात आले आहे. यानंतर हिंदीमध्ये कधी भारतात येऊन पाहा आणि मग बोला असा सल्ला देखील डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी असलेला एक मजकूर सोशल मीडियावर रिपोस्ट केला आहे. रेडिओ होस्ट मायकल सेवेज यांनी एक पत्र शेअर केले होते, ज्यामध्ये त्यांनी भारत आणि चीनचा उल्लेख 'नरकाचे द्वार' असा केला होता. ट्रम्प यांनी ही पोस्ट शेअर केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. " भारत आणि चीन दोन आशियाई देशांतील लोक नव्या महिन्यात बाळंतपणासाठी अमेरिकेत येतात आणि येथील कायद्यामुळे त्यांना झटपट अमेरिकन नागरिकत्व मिळते," असा आरोप सॅवेज यांनी केला होता.