Strait of Hormuz | 'होर्मुज'मधून भारताकडे येणारे जहाज इराणने रोखले! इस्लामिक गार्डने घेतले ताब्यात

Iran Seizes India-Bound Ships | सामुद्रधुनीत विनापरवाना प्रवेशाचा आरोप
Iran Seizes India-Bound Ships
प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo.
Published on
Updated on

Iran Seizes India-Bound Ships

तेहरान : इराणने पुन्हा एकदा भारताकडे येणाऱ्या जहाजांवर कारवाई केली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड (IRGC) ने होर्मुज सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) भारताकडे येणारे एक जहाज रोखून आपल्या ताब्यात घेतले आहे. हे जहाज परवानगीशिवाय होर्मुजमधून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इराणने केला आहे.

सामुद्रधुनीत विनापरवाना प्रवेशाचा आरोप

इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, "हॉर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जहाजांना IRGC ने जप्त केले असून त्यांना इराणच्या दिशेने नेण्यात येत आहे." न्यूज एजन्सी 'एएफपी'च्या वृत्तानुसार, इराणच्या गार्ड्सनी एका निवेदनात म्हटले आहे की, "इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाने आज सकाळी हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन जहाजांची ओळख पटवून त्यांना रोखले."

Iran Seizes India-Bound Ships
Strait of Hormuz news | अमेरिकेच्या नाकेबंदीनंतरही तीन देशांचे टँकर होर्मुझ पार

एकाच दिवशी तीन जहाजांवर हल्ल्याचे सत्र

यापूर्वी, बुधवारी इराणने हॉर्मुझ परिसरात एकूण तीन कंटेनर जहाजांवर हल्ले केल्याची माहिती समोर आली होती. UK मॅरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स सेंटर (UKMTO) ने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या एका गनबोटने ओमानपासून साधारण १५ नॉटिकल मैल ईशान्येला असलेल्या एका कंटेनर जहाजावर गोळीबार केला. ग्रीक कंपनीच्या मालकीच्या या 'एपामिनोंडास' जहाजाच्या 'ब्रिज' भागाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.

Iran Seizes India-Bound Ships
Blockade in Strait of Hormuz:'होर्मुझ'वरुन युद्ध चिघळणार? इराणच्या बंदरांची नाकेबंदी, चर्चेच्या दुसऱ्या फेरीची शक्यता

कंटेनर शिप लायबेरियाच्या ध्वजाखाली

'एपामिनोडेस' नावाचे हे कंटेनर शिप लायबेरियाच्या ध्वजाखाली (Liberia flagged) असून ते गुजरातच्या मुंद्रा बंदराच्या दिशेने येत होते. इराणी नौदलाच्या म्हणण्यानुसार, जहाजाच्या नेव्हिगेशन सिस्टममध्ये छेडछाड करण्यात आली होती, ज्यामुळे सागरी सुरक्षेला धोका निर्माण झाला होता.

Iran Seizes India-Bound Ships
Iran Israel US conflict |इराणचे नौदल कमांडर अलीरेझा तांगसिरी हल्ल्यात ठार, 'होर्मुझ' बंद करण्यात होती महत्त्वाची भूमिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news