Railway Police Case | होळीसाठी झाडाचा ओंडका चक्क लोकलमधून नेला; 6 जणांवर गुन्हा दाखल

रेल्वेचा प्रवास 20 मिनिटे विस्कळीत
Railway Police Case
Railway Police Case | होळीसाठी झाडाचा ओंडका चक्क लोकलमधून नेला; 6 जणांवर गुन्हा दाखलpudhari photo
Published on
Updated on

मुंबई; वृत्तसंस्था : मुंबईच्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, विरार ते माहीम दरम्यान लोकलमधून होळीसाठी एक भलामोठा झाडाचा ओंडका बांधून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. या जीवघेण्या प्रवासामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, पश्चिम रेल्वेने याप्रकरणी सहाजणांना अटक केली आहे.

मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये विरारहून माहीमला जाणार्‍या एका लोकलच्या डब्याबाहेर आडव्या पद्धतीने सुपारीच्या झाडाचा मोठा ओंडका बांधलेला दिसत होता. हा ओंडका डब्याच्या चारपैकी किमान तीन दरवाजांना अडथळा निर्माण करत होता. या प्रकारामुळे रेल्वे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आणि खबरदारीचा उपाय म्हणून ट्रेन थांबवण्यात आली, ज्यामुळे रेल्वे वाहतूक सुमारे 20 मिनिटे उशिराने चालली. पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सांगितले की, उपनगरीय गाड्यांमधून अशा प्रकारे मोठ्या वस्तू नेण्यास प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे बंदी आहे. रेल्वे गार्डने डब्याला ओंडका बांधल्याची माहिती दिल्यानंतर बोरिवली येथील सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, व्हिडीओ शेअर करणार्‍या यूजरने असा दावा केला आहे की, विरारहून माहीमला होळीसाठी झाड नेण्याची ही परंपरा ब्रिटिश काळापासून सुरू आहे. या प्रक्रियेत झाडाची पूजा करून ते कापले जाते आणि नंतर अशा प्रकारे वाहून नेले जाते. मात्र, अशा प्रकारामुळे अपघाताची दाट शक्यता असल्याने रेल्वेने कठोर भूमिका घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news