Indian Export Containers: मध्यपूर्व युद्धामुळे 45 हजार भारतीय कंटेनर अडकले

1 ते 1.5 अब्ज डॉलरच्या मालाचे भवितव्य अधांतरी; निर्यातीचा खर्च 3 ते 5 पट वाढला
Container Ship
Container ShipPudhari
Published on
Updated on

मुंबई : मध्य पुर्वेतील युध्दाने भारतीय निर्यातदारांना आर्थिक कोंडीत गाठले असून आज घडीला सुमारे 40 हजार ते 45 हजार कंटेनर्स अडकून पडले आहेत. एक तर हे कंटेनर्स प्रवासात थांबून आहेत किंवा कुठल्या ना कुठल्या बंदरात थाबलेले आहेत. परिणामी या सर्व कंटेनर्समधून असलेला एक ते दीड अब्ज डॉलर्स किंमतीच्या मालाचे भवितव्य आज तरी अधांतरी आहे.

केंद्रीय जहाज मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसानर भारतीय माल घेवून विदेशी रवाना होण्यापूर्वीच भारताच्या विविध बंदरांमध्ये रखडलेल्या जहाजांची संख्या 20 हजारांच्या आसपास आहे. आपली कधी सुटका होईल याची प्रतीक्षा या कंटेनर्सना आहे.

Container Ship
Maharashtra CET: सीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकार आढळल्यास थेट बंदी

या सर्व कंटेनर्ससमोर तूर्त दोनच मार्ग दिसतात. एक तर प्रचंड खार्चिक असा वळसा घेवून इच्छित स्थळी पाहोचणे किंवा सरळ युटर्न घेवून पुन्हा भारतात परतणे. ते देखील खर्चाचेच ठरणार आहे.

दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसे अशा कोंडीत सापडलेल्या कंटेनर्सवर शिपिंग लाईनर्सनी अनेक प्रकारचे आपतकालीन अधिभार लावण्यास सुरूवात केल्याने एका कंटेनरच्या निर्यातीसाठी येणाऱ्या खर्चात तीन ते पाच पट अतिरिक्त वाढ झाल्याचे आयात-निर्यात उद्योगातील जाणकारांनी सांगितले.

Container Ship
Mumbai LPG Shortage: मुंबईतील हॉटेल्सच्या मेनूमध्ये कपात; मंत्रालयातील कॅन्टीनही होणार बंद

ट्रायटॉन लॉजिस्टिक्स आणि मेरिटाईन या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय माल घेवून विदेशी निघालेल्या या 40-45 हजार कंटेनर्सपैकी 80 टक्के कंटेनर्स अद्याप जलप्रवासातच आहेत. अनेक कंटेनर्स हवाई मार्गानेही गेले आणि अडकून पडले. ज्या कंटेनर्समध्ये नाशीवंत माल होता तो कधीच खराब झाला आहे. जोडीला या कंटेनर्सना युध्द धोका अधिभार, खर्च वसुली अधिभार, पिक सिझन शुक्ल आकारले जात असल्याने माल वाहतूकीतुन मिळणारा उरला सुरला नफाही या कंटेनर्सनी कधीच गमावला आहे. प्रत्येक कंटेनरवर युध्द स्थितीमुळे आकारला जात असलेला अधिभार हा तीन हजार ते पाच हजार डॉलर्स इतका प्रचंड आहे.

Container Ship
Mumbai LPG Shortage: मुंबईतील हॉटेल्सच्या मेनूमध्ये कपात; मंत्रालयातील कॅन्टीनही होणार बंद

दरम्यान 12 मार्च रोजी भाजपा नेते महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेशाध्य रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, भाजापाचे आमदार प्रशांत ठाकूर, आ.महेश बालदी, आ.रविंद्र पाटील,आ.ज्ञानेश्वर म्हात्रे, आ.निरंजन डावखरे आदी ज्येष्ठ नेते अलिबागमध्ये उपस्थित राहाणार असून अध्यक्ष ,उपाध्यक्ष निवडीनंतर येथील जेएसएम कॉलेज मैदानावर तीन वाजता जाहीर सभेचे देखील आयोजन करण्यात आले असल्याचे ॲड.मोहिते यांनी अखेरीस सांगीतले.राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी हर्षल पाटील, ॲड,प्रविण ठाकूर, चारुहास मगर, आशिष भट तर भाजपाचे ॲड.महेश मोहिते,ॲड.आस्वाद पाटील ,ॲड.अंकित बंगेरा, सुनील दामले आदि

Container Ship
Mumbai LPG Shortage: मुंबईत लहान, मध्यम हॉटेल्सना मोठा फटका

पदाधिकारी येथील भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीस उपस्थित होते. रायगड जिल्हा पालकमंत्री पदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेना यांच्यात जिल्ह्यात तीव्र आणि विकोपाला गेलेला संघर्ष आहे. राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यात मोठी रस्सीखेच सुरु आहे. पालकमंत्रीपदाच्या राजकीय वादाच्या निमित्ताने ,शिवसेना आमदार व मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र दळवी यांनी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेतून शिंदे शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा निर्णय झाला. तर रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपाला आणि रायगडचे पालकंमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला असा निर्णय होण्याची शक्यता राष्ट्रवादी आणि भाजपा या उभय पक्षांमध्ये चर्चेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news