Indian Army Internship Scam | 'इंडियन आर्मी इंटर्नशिप'च्या नावाने फसवणूक; 75 हजारांच्या स्टायपेंडचे आमिष

Indian Army Internship Scam | भारतीय लष्कराच्या नावाचा गैरवापर करून तरुणांना फसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Indian Army Internship Scam
Indian Army Internship Scamfile photo
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा :
भारतीय लष्कराच्या नावाचा गैरवापर करून तरुणांना फसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. 'इंडियन आर्मी इंटर्नशिप'मध्ये तुमची निवड झाली असून दरमहा ७५ हजार रुपये स्टायपेंड मिळेल, असा दावा करणारे बनावट ई-मेल नागरिकांना पाठवले जात आहेत. या ई-मेलमधील लिंकवर क्लिक करून अर्ज करण्यास सांगितले जात आहे.

Indian Army Internship Scam
Navi Mumbai International Airport | नवी मुंबई विमानतळाची हवाई वाहतूक अचानक घसरली; दररोजच्या उड्डाणांची संख्या 100 वर

मात्र, या लिंकद्वारे वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दिला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीला आलेल्या ई-मेलमध्ये त्याची इंटर्नशिपसाठी निवड झाल्याचे सांगण्यात आले होते.

त्यासोबत 'अप्लाय' लिंक देण्यात आली होती. अशा लिंकवर क्लिक केल्यास नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल, पासवर्ड किंवा अन्य गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते. या माहितीचा पुढे आर्थिक फसवणुकीसाठी गैरवापर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यशस्वी यादव यांनी नागरिकांनी अशा बनावट ई-मेलला बळी न पडता लिंकची सत्यता तपासावी आणि कोणतीही गोपनीय माहिती शेअर करू नये, असे आवाहन केले आहे.

खरी इंटर्नशिप आहे; फसवणूक नेमकी कुठे?

विशेष म्हणजे 'इंडियन आर्मी इंटर्नशिप २०२६-२७' ही खरी योजना आहे. यंदा लष्कराने ४३ विशेष प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी अधिकृत अर्ज प्रक्रिया अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या राष्ट्रीय इंटर्नशिप पोर्टलमार्फत केली जाते. या इंटर्नशिपचा कालावधी ७५ दिवसांचा असून, पात्र उमेदवारांना अटींच्या अधीन राहून कमाल ७५ हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळू शकतो. मात्र, हा दरमहा मिळणारा पगार नाही. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर नियमानुसार स्टायपेंड देण्याची तरतूद आहे. तसेच इंटर्नशिप केल्याने भारतीय लष्करात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची हमी नसते.

Indian Army Internship Scam
Third Mumbai development: अटल सेतूपासून गावकुसापर्यंत रायगडचा विकासवेग; ‘तिसऱ्या मुंबई’च्या उभारणीला नवी दिशा

'फिशिंग' म्हणजे काय?

फिशिंगला सोप्या भाषेत 'बनावट लिंकद्वारे माहिती चोरी' असे म्हणता येईल. सायबर गुन्हेगार सरकारी संस्था, बँक, कंपनी किंवा लष्कराच्या नावाने बनावट ई-मेल अथवा संदेश पाठवतात. त्यातील लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांकडून वैयक्तिक, आर्थिक किंवा गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.

'फेक ई-मेल' कसा ओळखाल?

  • अचानक आलेल्या ई-मेलवर अविश्वास : अचानक आलेल्या 'आर्मी इंटर्नशिप' ई-मेलवर लगेच विश्वास ठेवू नका.

  • थेट लिंकवर क्लिक टाळा : ई-मेलमधील 'अप्लाय नाऊ' किंवा अन्य लिंकवर थेट क्लिक करू नका.

  • गोपनीय माहिती शेअर करू नका : ओटीपी, पासवर्ड, बँक खाते, कार्ड किंवा आधारची माहिती देऊ नका.

  • अधिकृत पोर्टलवर खात्री करा : इंटर्नशिपची माहिती अधिकृत पोर्टलवरच तपासा.

  • पैशांच्या मागणीबाबत सावध राहा : पैसे भरण्यास सांगितल्यास सावध व्हा.

  • सायबर पोलिसांकडे तक्रार : संशयास्पद ई-मेल आल्यास त्याची माहिती सायबर पोलिसांना द्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news