Mumbai| आईकडून मुलांना अमानूष मारहाण; गोरेगावच्या पारसी कॉलनीतील घटना

गोरेगावच्या पारसी कॉलनीत महिला मुलांना बेल्टने मारत असल्याचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
Brutal beating of children by mother
आईकडून मुलांना अमानूष मारहाणFile Photo

गोरेगावच्या पारसी कॉलनीत महिला मुलांना बेल्टने मारत असल्याचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान, माजी न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांनी कारवाईची मागणी केली आहे.

Brutal beating of children by mother
पंचगंगा 20.7 फुटांवर; 9 बंधारे पाण्याखाली

सोशल मीडियावर समोर आलेला धक्कादायक व्हिडिओ शाहरुख काथावाला यांनी रेकॉर्ड केला होता. व्हिडिओमध्ये ही महिला मुलांना बेल्टने अमानूष मारहाण करताना दिसत आहे. मात्र, मारहाणीपासून मुलांना वाचवण्यासाठी पतीने हस्तक्षेप का केला नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांनी मुंबई पोलीस, राज्य मानवाधिकार आयोग आणि राज्य बाल हक्क आयोगाला आपल्या मुलांना बेल्टने मारहाण करत असलेल्या अपल्या पत्नीवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

Brutal beating of children by mother
मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर घोटाळ्याचा बॉम्ब

माजी न्यायाधीशांनी व्हिडिओबाबत गंभीर चिंता व्यक्त करत सांगितले की मुलांना सुरक्षा देणे आवश्यक आहे. गोरेगाव (पूर्व) येथील निरलॉन पारसी पंचायत संकुलात ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर समोर आलेला धक्कादायक व्हिडिओ महिलेच्या पतीने रेकॉर्ड केला होता. व्हिडिओमध्ये ही महिला मुलांना बेल्टने मारहाण करताना दिसत आहेत.

Brutal beating of children by mother
पाचगाव : कळंब्याच्या कात्यायनी मंदिरात चोरी

मुले वाचवण्याची विनंती करताना दिसतात. मात्र, आई मुलांना बेल्टने मारहाण करताना थांबत नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.

आणि संबंधित नेटकऱ्यांनी व्हिडिओमध्ये मुलांना बेल्टने मारहाण करताना दिसणाऱ्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी संबंधित डीसीपींना कारवाई करण्यास सांगितले आहे. पोलिसांनी कुटुंबाचीही भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news