ममता बॅनर्जींच्या बैठकीत शरद पवारांच्या नावावर होऊ शकत एकमत : संजय राऊत

ममता बॅनर्जींच्या बैठकीत शरद पवारांच्या नावावर होऊ शकत एकमत : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी दिल्ली येथे बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेचा प्रतिनिधी जाणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर एकमत होऊ शकतं, अस सूचक वक्तव्य शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी केले आहे. अयोध्या येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी देशभरातील विरोधी पक्षनेत्यांची बैठक १५ जून रोजी दिल्ली येथे आयोजित केली आहे. या बैठकीला शिवसेनेचा प्रतिनीधी उपस्थित राहणार आहे.  शरद पवार देशाचे अनुभवी व संसदीय राजकारणातील अजिंक्य नेते आहेत. देशाला आदर्श राष्ट्रपती हवा असेस तर पवार आहेत आणि रबर स्टॅम्प पाहिजे असेल तर अनेक लोक रांगेत आहेत, असा टोला राऊत यांनी लागावला.

बैठकीत सर्वसहमतीने उमेदवाराचा शोध सुरु असल्याने शरद पवारांच्या नावावर एकमत होऊ शकतं. पवारांनी या गोष्टीला मान्यता द्यायला हवी तरच पावले पुढे पडू शकतात असे ऱाऊत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news