हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी नेत्यांची महत्त्‍वपूर्ण बैठक

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी नेत्यांची महत्त्‍वपूर्ण बैठक

Published on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : नागपूर येथे १९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्‍वपूर्ण बैठक आज (दि. ३०) विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधानभवनातील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आदित्य ठाकरे, दिलीप वळसे पाटील, एकनाथ खडसे, हसन मुश्रीफ, अनिल परब, सुनील प्रभू, अजय चौधरी, शशिकांत शिंदे, भाई जगताप, सचिन अहिर, सुरेश वरपुडकर, अमिन पटेल, अनिल पाटील, बाळाराम पाटील, अबू आझमी, कपिल पाटील, रईस शेख आदी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news