एमओयू झाला म्हणजे कंपनी राज्यात येत नाही : उदय सामंतांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर | पुढारी

एमओयू झाला म्हणजे कंपनी राज्यात येत नाही : उदय सामंतांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : एमओयू झाला म्हणजे कंपनी राज्यात येत नाही. वेदांता – फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्यात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पत्र दिले होते. डाओस मध्ये झालेल्या माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बैठकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर उद्योग विश्वाला चालना मिळाल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज (दि.३०) पत्रकार परिषदेत केला.

राज्यातील वेदांता – फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, याचे पुरावे माझ्याकडे आहेत. कोणत्या बैठकीनंतर हा प्रकल्प बाहेर गेला. या बैठकीबाबत मुख्यमंत्र्यांना माहित होते का ? असा सवाल करून याबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर माझ्याशी बोलावे, असे थेट आव्हान माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. यावर आता मंत्री सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button