मुंबईत आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने इमारतीवरून उडी मारून जीवन संपविले

मुंबईत आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने इमारतीवरून उडी मारून जीवन संपविले

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने जीवन संपविल्याची घटना आज (दि.३) पहाटे पहाटे ४ च्या सुमारास घडली. नरिमन पॉइंट येथील शासकीय निवासस्थानाच्या १० व्या मजल्यावरून तिने उडी मारली. लिपी विकासचंद्र रस्तोगी (वय २७) असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

लिपी हिने उडी मारल्यानंतर तिला तत्काळ जीटी रुग्णालयात दाखल केले.मात्र, तिला मृत घोषित करण्यात आले. ती सोनीपत (हरियाणा) येथे एलएलबीचे शिक्षण घेत होती. शिक्षणातील ताणतणावामुळे ती चिंतेत होती. तिने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. ज्यामध्ये तिने आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे. या घटनेची कफ परेड पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राधिका रस्तोगी असे लिपीच्या आईचे नाव आहे. तर वडिल विकासचंद्र रस्तोगी हे आयएएस अधिकारी आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news