रेल्वे डब्यांची संख्या कधी वाढवणार? पुणे- मुंबई- पुणेदरम्यानची स्थिती

रेल्वे डब्यांची संख्या कधी वाढवणार? पुणे- मुंबई- पुणेदरम्यानची स्थिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अनेक प्रवासी या प्रवासाच्या तिकिटांसाठी कायमच वेटिंगवर असतात. चाकरमान्यांना गर्दीत गुदमरून प्रवास करावा लागत आहे. त्यांना तिकीट काढूनही बसायला जागा मिळत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुणे-मुंबई-पुणेदरम्यान धावणार्‍या रेल्वे गाड्यांचे डबे वाढवावेत, अशी मागणी होत आहे. रेल्वे गाड्यांचे डबे वाढवावेत आणि अतिरिक्त डबे प्लॅटफॉर्मवर बसावेत याकरिता रेल्वेने 36 तासांचा ब्लॉक घेतला होता. रविवारी (दि. 2) हा ब्लॉक संपला अन् मध्य रेल्वेचे प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात पुणे-मुंबई-पुणेदरम्यान धावणार्‍या रेल्वे गाड्यांचे डबे वाढण्याची शक्यता आहे.

मात्र, याकरिता मध्य रेल्वेने आणखी वाट पाहू नये, तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. पुण्याहून मुंबईला दररोज ये-जा करणार्‍या सिंहगड, प्रगती, डेक्कन, डेक्कन क्वीनला प्रचंड गर्दी असते. या गाड्यांमध्ये बसण्याच्या जागेवरून प्रवाशांची मारामार होते. तिकीट काढूनही प्रवासी कायमच वेटिंगवर असतात. त्यामुळे डबे वाढवण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी होत आहे.

रेल्वे गाड्यांचे डबे वाढविण्याची आमची अनेक वर्षांची मागणी होती. त्यामुळेच रेल्वेने मुंबईतील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविली आहे. आता या प्लॅटफॉर्मवर 24 कोचच्या गाड्या उभ्या राहतील. मात्र, रेल्वेने हे प्लॅटफॉर्म 36 कोचचे करायला हवे होते. पुणे-मुंबईला जायला भरपूर गर्दी आहे. त्यामुळे रेल्वेने पुणे-मुंबईदरम्यान धावणार्‍या सर्व गाड्या 24 डब्यांच्या कराव्यात आणि तासाला एक गाडी सोडण्याचे नियोजन करावे. तसेच, पुणे-मुंबईदरम्यानच्या काही रेल्वे गाड्यांना व्हिस्टाडोम कोचमुळे आता सेकंड क्लासचा एक डबा कमी झाला आहे. त्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान धावणार्‍या गाड्यांचे डबे तातडीने वाढवावेत.

– हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

पुणे-मुंबईदरम्यानच्या गाड्यांचे डबे वाढवण्यासंदर्भातील प्रवाशांची आणि प्रवासी संघटनांनी आम्हाला मागणी केली आहे. गाड्यांचे डबे वाढवण्यासाठीच मुंबईतील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविली आहे. लवकरच पुण्यातील काही प्लॅटफॉर्मची लांबीदेखील वाढविली जाणार आहे. तसेच, पुणे-मुंबईदरम्याच्या गाड्यांचे डबे वाढविण्यासंदर्भातील मागणीचे पत्र आम्ही लवकरच रेल्वे मुख्यालयाला देणार आहोत.

– इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे विभाग

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news