पाथर्डी-मुंबई बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने अपघात; चालकासह 9 जखमी

पाथर्डी-मुंबई बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने अपघात; चालकासह 9 जखमी

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : एसटी बसचा तांत्रिक बिघाड होऊन पाथर्डी-मुंबई या पाथर्डी आगाराच्या बसचा पुण्याजवळ अपघात होऊन चालक व आठ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि. 1) रात्री एक वाजता घडली.
पाथर्डी आगारातून दररोज रात्री साडेआठ वाजता मुंबईसाठी रातराणी बस निघते. शनिवारी

(दि.1) रात्री चालक सतीश वारे पाथडी4- मुंबई बस क्रमांक एमएच 14, बीटी 3090) बस घेऊन नगरहून पुण्यामार्गे मुंबईकडे जात असताना पुणे जिल्ह्यातील पेरणे फाट्यानजिक बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने समोरच्या ट्रकवर बस धडकून रस्ता दुभाजकावर आदळली. त्यामध्ये एसटी बसचे मोठे नुकसान झाले. चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाहक संभाजी जायभाय यांच्यासह सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत.

पाथर्डी आगाराचा अनागोंदी कारभार

पाथर्डी आगारातील सर्वच बसेस रस्त्यावर धावताना कधी आणि केव्हा कुठेही बंद पडेल, याचा भरवसा नाही. रस्त्यावर बस बंद पडणे हे नित्याचे झाले असल्याने बसगाड्या रस्त्यावर धावणे योग्य नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. लांबपल्ल्यांसाठी लागणार्‍या चांगल्या गाड्या पाथर्डी आगाराकडे नसल्याने सध्या धावणार्‍या गाड्या कधी वेळेवर पोहोचत नाही. बसगाड्यांची किलोमीटर क्षमता संपले असून देखभाल दुरुस्तीसाठी वेळ सुद्धा मिळत नाही. वेळ मिळाला, तर गाड्यांचे सुट्टे भाग वेळेवर मिळत नाही. अशा खराब बसगाड्या चालवणे पाथर्डी आगारातील चालकांची कसरत म्हणावी लागेल. मात्र, ही कसरत आता चालक वाहक आणि प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे.

ढिसाळ कारभाराचा प्रवाशांना फटका

पाथर्डी आगाराची एकही बस प्रवास करण्याच्या योग्यतेची नसून एसटी आगाराचा ढिसाळ कारभारमुळे सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठीचा फटका बसत आहे. एसटीची सेवा ही अत्यंत जीव घेणे झाले आहे. एसटीचा कारभार सुधारून नवीन बसगाड्या पाथर्डी आगाराला मिळाव्यात, त्यासाठी रस्त्यावर उतरू असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख यांनी दिला.

एसटीचा कारभार सुधारावा, यासाठी अनेक आंदोलने केली. त्यावर एसटीच्या वरिष्ठ प्रशासनाकडून पाथर्डी आगाराच्या कारभारात गती येऊन चांगला कारभार होईल, अशीच आश्वासन दिले गेले. मात्र, त्यात कोणताही फरक पडला नाही.

– मुकुंद गर्जे, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news