Gunratna Sadavarte on Manoj Jarange: मराठा शिंदेंचा आवडता कलाकार जरांगे, दिग्दर्शक उदय सामंत; सदावर्तेंची फटकेबाजी

Gunratna Sadavarte on Manoj Jarange
Gunratna Sadavarte on Manoj Jarangepudhari
Published on
Updated on

Gunratna Sadavarte on Manoj Jarange: आरक्षणाबाबतच्या मागण्या घेऊन गेल्या २० दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं. त्यानंतर आता त्याच्यावर महाराष्ट्रातील विविध लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्रातील वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन मागे घेण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Gunratna Sadavarte on Manoj Jarange
Gunaratna Sadavarte: ‘एकनाथ शिंदे प्रोड्युसर, उदय सामंत डायरेक्टर, मनोज जरांगे अभिनेता’; गुणरत्न सदावर्तेंची जोरदार टीका

ही सीजन संपला आहे

मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण आणि मुंबईतील आंदोलन स्थगित केल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी, हा सीजन संपला आहे. आर्थिक राजधानीला संकटात आणण्याचा प्रयत्न होता. मात्र मुघली विचार असलेले मन्यासारखे लोक बाप्पांच्या कार्यात विघ्न आणू शकत नाहीत. ही सगळी सेटिंग आहे. हेकडी कलाकार आहे. या कलाकारापासून जनता दूर गेली आहे.'

Gunratna Sadavarte on Manoj Jarange
Gunaratna Sadavarte Nashik | बेघरांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा

डायरेक्टरनं सांगितलं आंदोलन गुंडाळलं

सदावर्ते यांनी मनोज जरांगेच्या आंदोलनावरून शिंदेंच्या शिवसेनेवर देखील खोचक टीका केली. त्यांनी पॅरिसमधून जरांगे उद्योगी सूत्रांच्या हवाली हेच सांगितलं असेल चिंता करू नका. डायरेक्टर बोलल्याशिवाय मन्याने (मनोज जरांगे पाटील) आंदोलन गुंडाळलेले नाही. मेलो मेलो म्हणणारा डायरेक्ट पत्रकार परिषद घेतो. याला राजकारणी झालर होती.

Gunratna Sadavarte on Manoj Jarange
Gunaratna Sadavarte : मराठा आंदोलकांचा ॲड. गुणरत्‍न सदावर्ते यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न

एकनाथ शिंदेंना सर्व क्रेडिट

सदावर्ते यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना देखील टोला लागावत, उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार. याचे सर्व क्रेडिट आपल्याला जाते. उदय सामंद हे डायरेक्टर आहेत. प्रताप सरनाईक एकदा म्हणालेच होते की आपलं सेटिंगमधले आंदोलन आहे. उदय सामंत यांना खूप कंट्रोल केलं. माल मन्यापर्यंत पोहचू शकला नाही म्हणून त्यांना आंदोलन मागे घ्यावे लागले असे वक्तव्य केलं.

Gunratna Sadavarte on Manoj Jarange
Gunratan Sadavarte: कोर्टाच्या विरोधात जाऊन रास्ता रोको; जरांगेंच्या आंदोलनाविरोधात सदावर्तेंची थेट पोलिसांत तक्रार

सेटिंग आंदोलन होते . उदय सामंत यांना खूप कंट्रोल केले.. माल मन्या पर्यंत पोहचू शकला नाही म्हणून त्याला आंदोलन मागे घ्यावे लागले असा देखील दावा सदावर्ते यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news