Gunratan Sadavarte: कोर्टाच्या विरोधात जाऊन रास्ता रोको; जरांगेंच्या आंदोलनाविरोधात सदावर्तेंची थेट पोलिसांत तक्रार

आंदोलनाला राजकीय पाठिंबा तसेच, आंदोलन कोर्टाच्या नियमांविरुद्ध असल्‍याचा आरोप
Gunratna Sadawarte
Gunratna SadawartePudhari
Published on
Updated on

Gunratan Sadavarte | Complaint Filed Against Manoj Jarange Patil’s Maratha Morcha

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवात आंदोलन पुकारले आहे. मुंबई येथे त्‍यांचा मोर्चा पोहचला असून मुंबईत प्रंचड गर्दी झाली आहे. त्‍यामुळे वकील गुणरत्‍न सदावर्ते यांनी या मोर्चाच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली असून. या आंदोलनात कोर्टाच्या विरोधात जाऊन रास्ता रोको केला जातोय असा आरोप केला आहे. तसेच या मोर्चामध्ये कोणत्‍याही प्रकारच्या नियमांचे पालन केले जात नाही असेही म्‍हटले आहे.

Gunratna Sadawarte
तुळजापुरात गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात घोषणाबाजी

मराठा समाजाला ओबिसी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे महामोर्चा आयोजित केला आहे. लाखोंच्या संख्यने मराठा आंदोलक पोहचले आहेत त्‍यामुळे मुंबईवर ताण पडला आहे. यामुळे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलकांवर त्वरित कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, व आझाद मैदान पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पुढे सदावर्ते यांनी आंदोलनावर गंभीर आरोप करत त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत मोर्चामध्ये कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन करून रास्ता रोको करण्यात आल्याचे नमूद केले आहे.

Gunratna Sadawarte
Maratha Morcha: मराठा वादळ आझाद मैदानात, मुंबईत वाहतूक कोंडी; कुठे काय परिस्थिती?

मुंबईतील व्यवसाय कसा थांबवला जात आहे हे दिसतंय. त्यांनी आजची जी तारीख निवडली चुकीचं होतं. हे आंदोलन जे सुरू आहे ते कायदाच्या सीमा तोडली जात आहे.

गुणरत्ने सदावर्ते

आंदोलनाला राजकीय पाठिंबा ?

मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाला राजकीय पाठिंबा असल्यामुळे परिस्थिती अधिक बिघडली आहे असा आरोपही सदावर्ते यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बजरंग सोनवणे आणि संजय जाधव यांच्या विरोधातही त्‍यांनी तक्रार केली आहे. या नेत्यांनी आंदोलनाला थेट किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचा आरोप त्यांच्या तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीमुळे सुरू असलेल्या आंदोलनाला नवा कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news